
Gujarat Titans vs Delhi Capitals Dream11 Team Prediction, IPL 2025: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) 2025 चा 35 वा सामना 19 एप्रिल (शनिवार) रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता (IST) खेळला जाईल. गुजरात टायटन्स सध्या आयपीएल 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखालील संघाने सहा लीग सामन्यांपैकी चार जिंकले आहेत. तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्या सामन्यात जीटीला लखनौ सुपर जायंट्सकडून पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यापूर्वी गुजरातने आपल्या संघात बदल केले आहेत. दुखापतग्रस्त ग्लेन फिलिप्सच्या जागी श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाचा संघात समावेश करण्यात आला आहे.
दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स सध्या आयपीएल 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाने आतापर्यंत सहापैकी पाच सामने जिंकले आहेत आणि फक्त एकच सामना गमावला आहे. दिल्लीने राजस्थान रॉयल्सविरुद्धचा शेवटचा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकून आपला फॉर्म उत्तम पद्धतीने सुरू ठेवला. त्या सामन्यात मिचेल स्टार्कने शानदार गोलंदाजी केली आणि सामनावीराचा किताब जिंकला. जीटी आणि डीसी यांच्यातील हा सामना दोन्ही संघांसाठी पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान मजबूत करण्याची सुवर्णसंधी असेल आणि प्रेक्षकांना एक रोमांचक सामना पाहता येईल. (RCB vs PBKS, TATA IPL 2025 34th Match Live Scorecard: पंजाब किंग्जचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 5 विकेटने विजय; गुणतालीकेत थेट दुसऱ्या स्थानावर उडी)
अहमदाबाद हवामान लाईव्ह अपडेट्स
गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल 2025 चा सामना 19 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वाजता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. हवामान खात्याच्या ताज्या माहितीनुसार, आज शनिवारी अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता नाही. दुपारी तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे, तर रात्री ते 31 ते 27 अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते. अशा परिस्थितीत, खेळाडूंना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागू शकतो, विशेषतः दुपारच्या सामन्यांमध्ये.
नरेंद्र मोदी स्टेडियमचा खेळपट्टी अहवाल
नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पारंपारिकपणे फलंदाजांना अनुकूल मानली जाते. फलंदाज येथे उसळीवर अवलंबून राहू शकतात आणि मोकळेपणाने फटके खेळू शकतात. तथापि, जीटी विरुद्ध डीसी सामना दुपारी खेळला जाईल. जो गोलंदाजांना देखील मदत करेल अशी अपेक्षा आहे. विशेषतः फिरकी गोलंदाजांना वळण मिळू शकते. तर वेगवान गोलंदाजांना नवीन चेंडूने हालचाल देखील मिळू शकते.