PC-X

RCB vs PBKS Live Score Updates of IPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात आज सामना पार पडला. पावसाच्या व्यत्ययामुळे दोन्ही संघांसाठी सामना प्रत्येकी 14-14 ओवर्सचा करण्यात आला होता. सामन्यात पंजाबच्या संघाने बंगळुरूला 5 गडी राखून मात दिली. आरसीबीने पंजाबपुढे 96 धावांचे लक्ष ठेवले होते. प्रत्यूतरात पंजाबने 5 गडी राखून 98 धावा केल्या. अशा प्रकारे पंजाबने सामना सहजरित्या जिंकला. त्यामुळे पंजाब संघाने गुणतालीके आरसीबीला मागे टाकून पुढे सरकला आहे. पंजाब संघाकडून सर्वाधिक धावा नेहाल वढेरा याने केल्या. नेहाल वढेराने 19 चेंडूत 33 धावा केल्या. पंजाबच्या गोलंदाजांसह फलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. मात्र, कर्णधार श्रेयस अय्यरची बॅट चालली नाही. तो 7 धावा करून बाद झाला. दुसरीकडे, बंगळुरूचा संघ अवघ्या 12 षटकांत संपूर्ण बाद झाला. विराट कोहलीसह, कृणाल पांड्या अवघी 1 धाव करून पव्हेलीयमध्ये परतले. इतर खेळाडूंनीही चांगले प्रदर्शन केले नाही. पहा सामन्याचे स्कोअरकार्ड

टीम हेव्हीडने मात्र सामन्यात चांगली खेळी केली. त्याने अर्धशतक झळकावले. तर कर्णधार रजत पाटीदार ने 23 धावाकरून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि संघ पराभूत झाला. पंजाबच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. अर्शदिप सिंग, यजुवेंद्र चहल, हरप्रीत बरार, मार्को जॅनसेन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. झेवियर बार्टलेट ने एक विकेट घेतली. बेंगळुरूचा 14 षटकांचा हा डाव त्यांनी अवघ्या 12 षटकांत संपवला. या हंगामात आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहेत. तर, पंजाब किंग्जची कमान श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे. ज्यामध्ये त्यांची कामगिरी आतापर्यंत खूपच चांगली राहिली आहे. आरसीबी संघ 8 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, पंजाब किंग्जचेही 8 गुण आहेत आणि ते चौथ्या क्रमांकावर आहेत.

बेंगळुरूमध्ये सकाळपासूनच पावसाचे सावट होते. पावसामुळे तेथे आरसीबी आणि पंजाब यांच्यातील टॉसही वेळेत होऊ शकला नव्हता. इंडियन प्रीमियर लीग 2025चा 34 वा सामना आज शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयोजित करण्यात आला आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.

पंजाब किंग्ज: प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन आणि युझवेंद्र चहल.