Gautam Gambhir (Photo Credit-PTI)

इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League)  सध्या देशभरात धूम आहे. यंदाच्या सीजनमध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (Royal Challengers Bangalore) चांगलाच धुव्वा उडाला आहे. सातत्याने सहा सामने हरल्यामुळे विराटच्या संघाची क्रमवारीत घसरण झाली आहे. बंगलोरच्या टीमचा सातत्याने होणार पराभव पाहता भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.

टाईम्स ऑफ इंडियामधील आपल्या स्तंभलेखात गौतम गंभीरने विराटला अजूनही बरेच काही शिकण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. फलंदाज म्हणून विराटचा हात कोणी धरु शकत नाही. मात्र कर्णधार म्हणून तो योग्य करत नाहीये. गोलंदाजांवर दोष लावण्याऐवजी विराटने टीमच्या पराभवाची जबाबदारी स्वतः घ्यायला हवी. त्याचबरोबर गंभीरने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या टीम मॅनेजमेंटवरही प्रश्न उपस्थित केले. IPL 2019 मधील सहाव्या पराभवानंतर रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर सोशल मीडियावर ट्रोल; फनी मीम्स व्हायरल

पुढे त्याने म्हटले, यंदाच्या सीजनमध्ये एकही फास्ट बॉलर न घेऊन बंगलोरच्या संघाने चूक केली आहे. तसंच मार्कस स्टोइनिस आणि नाथन कुल्टर नाईल हे खेळाडू सुरुवातीपासूनच उपलब्ध होणार नसल्याचे माहित असताना देखील त्यांना टीममध्ये सहभागी करण्यात आले.

आपल्या लेखात गौतम गंभीरने विराट कोहलीच्या कर्णधार पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. त्याने लिहिले की, "सातत्याने मिळणाऱ्या अपयशानंतरही विराटकडे बंगलोरचा कर्णधारपद शाबूत आहे. यासाठी त्याला भाग्यशाली समजायला हवे."