टीम इंडियाला एकाच दिवशी टेस्ट आणि टी-20 सामने खेळावे लागल्यास माजी निवडकर्ता MSK Prasad यांनी निवडला प्लेयिंग XII; एमएस धोनी याला डच्चू
एमएसके प्रसाद आणि एमएस धोनी (Photo Credit: PTI/Getty)

बीसीसीआयचे माजी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांनी नजीकच्या भविष्यात भारतीय क्रिकेट टीमला (Indian Cricket Team) एकाच दिवशी कसोटी आणि टी-20 सामना खेळावा लागल्यास भारताची प्लेयिंग बारा निवडली. त्याच्या व्यतिरिक्त अजित आगरकर आणि किरण मोरे यांनीही या संदर्भात भारताची प्लेइंग बारा निवडली. विशेष म्हणजे एमएसकेच्या आंतरराष्ट्रीय टी-20 इलेव्हनमध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma), या दोघांची समावेश नाही. शिवाय, दोन्ही इलेव्हनमध्ये एमएस धोनी (MS Dhoni) याला स्थान मिळाले नाही. प्रसाद यांनीटी-20 इलेव्हनमध्ये युवा खेळाडूंची निवड केली आणि अनुभवी खेळाडू म्हणून शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांना शामिल केले. कोविड-19 महामारीनंतर खेळ पुन्हा सुरु झाल्यास टीमला एकावेळी दोन फॉरमॅटमध्ये खेळावे लागल्यास त्यांच्या प्लेयिंग इलेव्हनबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रसाद यांनी खेळाडूंची निवड केली. विराट, रोहित आणि जसप्रीत बुमराह, या भारतीय संघाच्या सध्याच्या सेटअपमधील सर्व मोठ्या नावांची प्रसाद यांनी कसोटी संघात निवड केली. दुसरीकडे, केएल राहुल, शिखर, श्रेयस अय्यर, रिषभ पंत यांचा टी-20 इलेव्हनमध्ये समावेश केला. (आकाश चोपडा याने निवडली बेस्ट वनडे XI; परदेशी कर्णधारासह 4 भारतीय क्रिकेटपटूंचा केला समावेश)

एमएसकेने दोन्ही संघासाठी मजबूत गोलंदाजीची नोंद केली. त्याने इशांत शर्मा, बुमराह, मोहम्मद शमी, रवी अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना कसोटी मालिकेसाठी निवडले. दुसरीकडे, टी-20 संघात त्यांनी भुवनेश्वर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चाहर, हार्दिक आणि क्रुणाल पंड्या यांचा उल्लेख केला. कसोटीतज्ज्ञ मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, रिद्धिमान साहा, अजिंक्य रहाणे आणि अश्विनची निवड झाल्याने आश्चर्य वाटले नाही. तथापि, एमएसकेने टी-20 साठी कोहली किंवा रोहितशिवाय नवीन फलंदाजीचे समर्थन केले.

भारताची कसोटी XII

रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.

भारताचा टी 20 XII

केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि नवदीप सैनी.