भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा, स्टार रणजी क्रिकेटपटूची COVID-19 मुळे अकाली एक्झिट! 
Representational Image (Photo Credits: Pixabay)

राजस्थानचे (Rajasthan) माजी फिरकीपटू आणि रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) विजेत्या संघाचा सदस्य विवेक यादव (Vivek Yadav) यांचे कोरोना व्हायरसशी संबंधित गुंतागुंतीमुळे निधन झाले. ते 36 वर्षांचे होते आणि त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. यादव यांनी बुधवारी शहरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि नुकतंच आयपीएल 2021 मध्ये भाष्यकर्त्याची भूमिका साकारणार्‍या आकाश चोपडा (Aakash Chopra) यांनी विवेकच्या निधनानंतर ट्विटर पोस्टद्वारे शोक व्यक्त केला आहे. “राजस्थान रणजी प्लेअर आणि प्रिय मित्र ... विवेक यादव आता आपल्यात नाही. त्याच्या आत्म्याला शांती मिळो. कुटुंबासमवेत विचार आणि प्रार्थना,” भारताचे माजी सलामीवीर आकाश चोपडा यांनी ट्विट केले. (Veda Krishnamurthy वर कोसळला दुःखाचा डोंगर, आईपाठोपाठ बहिणीचे COVID-19 मुळे निधन)

दरम्यान, यादव यांच्या कर्करोगावर उपचार सुरू होते आणि कीमोथेरपीसाठी ते रुग्णालयात गेले होते, जिथे त्यांची टेस्ट घेण्यात आली व कोविड-19 अहवाल सकारात्मक आला. देशभरात पसरलेल्या या घटक महामारीशी लढाई हारवण्यापूर्वी त्यांची तब्येत ढासळली होती. विवेक यादवची क्रिकेट कारकीर्द पाहता त्याने 2008 मध्ये राजस्थानकडून प्रथम श्रेणीचे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यादवने 18 प्रथम श्रेणी सामने खेळले आणि 57 विकेट्स घेतल्या असून ते 2010-11 रणजी ट्रॉफीचा फायनल सामना खेळले होते. 30 वर्षांचा होण्यापूर्वी त्याने शेवटचा स्पर्धात्मक सामना खेळला होता. विवेक 2010-11 च्या मोसमात रणजी करंडक जिंकणार्‍या संघाचा देखील एक भाग होता. अंतिम सामन्यात राजस्थानने बडोद्याला पराभूत करून विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात बडोद्याविरुद्धच्या पहिल्या डावात त्याने 91 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या आणि राजस्थानला पहिल्या डावात आघाडी मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

दुसरीकडे, 2012 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याला संघात सामील केले होते पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.