Photo Credit- X

Ajay Jadeja Declared Heir Jamnagar Throne:  जामनगर राजघराण्याचा (Jamnagar throne) पुढील उत्तराधिकारी म्हणून माजी क्रिकेटपटू अजय जडेजा (Former Indian cricketer Ajay Jadeja) यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. शत्रुशल्यसिंहजी जडेजा (Shatusalyasinhji Jadeja) यांनी विजयादशमीच्या शुभ मुहूर्त साधत हा घोषणा केली आहे. शत्रुशल्यसिंहजी यांनी एक पत्र जाहीर केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, 'आज दसऱ्याच्या दिवशी पांडव हे वनवास संपवून विजयासह परतले होते. या शुभ मुहूर्तावर मी या कोंडीतून सुटलो आहे. मी माझा उत्तराधिकारी नेमला आहे. मला विश्वास आहे की जामनगरच्या जनतेचा आशीर्वाद त्यांना मिळेल आणि ते पूर्ण निष्ठेने त्यांची सेवा करतील. मी सर्वांचा आभारी आहे', असे ते म्हणाले. (हेही वाचा: NZ W vs SL W, 2024 ICC Women's T20 World Cup Preview: श्रीलंका न्यूझीलंड आज आमनेसामने; हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पहाल, जाणून घ्या)

कोण आहेत अजय जडेजा?

अजय जडेजा हे माजी क्रिकेटपटू आहेत. ते जामनगर राजघराण्याचे सदस्य आहेत. त्याचे नवानगर संस्थानाशी संबंध आहे. ते रणजीतसिंहजी जडेजा आणि दलीपसिंहजी जडेजा यांच्या कुटुंबातील आहेत. त्यांच्या नावावरुनच भारतात रणजी ट्रॉफी आणि दलीप ट्रॉफी खेळण्यात येते. रणजीतसिंहजी जडेजा आणि दलीपसिंहजी क्रिकेटपटू असतानाच नवानगर संस्थानाचे राजे होते. याशिवाय शत्रुशल्यसिंहजी यांचे वडील दिग्विजयसिंहजी हे पण त्याच घरातील आहेत. 85 वर्षांचे शत्रुशल्यसिंहजी यांना अपत्य नाही. त्यांना उत्तराधिकारी निवड करायची होती. त्यांनी पुढील वारस म्हणून अजय जडेजा यांची निवड केली आहे.

माजी क्रिकेटपटू अजय जडेजा जामनगर राजघराण्याचे वारसदार

शत्रुशल्यसिंह कोण आहेत?

स्वतः शत्रुशल्यसिंहजी दमदार खेळाडू होते. त्यांनी 1958-59 मध्ये सौराष्ट्र संघासाठी तत्कालीन बॉम्बे संघाविरोधात फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी 1959-60 मध्ये तीन सामने खेळले होते. तर 1961-62 मध्ये त्यांनी चार सामने खेळले होते. पुढच्या वर्षी 1962-63 मध्ये ते तितकेच सामने खेळले होते. त्यांनी इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेट क्लबमध्ये पण जोरदार फलंदाजी केली आहे. पण त्यांना कधीही भारतीय संघाकडून खेळता आले नाही. शत्रुशल्यसिंहजी यांनी फर्स्ट क्लास करिअरमध्ये 29 सामने खेळले, त्यामधील 22 मध्ये त्यांनी सरासरी 1061 धावा चोपल्या तर 36 बळी घेतले.