PC-X

Faf du Plessis Record: मेजर लीग क्रिकेट (MLC) 2025 सध्या जोरात सुरू आहे. लीग स्टेज आता संपण्याच्या जवळ आला आहे. टेक्सास सुपर किंग्ज (TSK) हा अशा संघांपैकी एक आहे जो प्लेऑफसाठी पात्र ठरणाऱ्या संघांपैकी एक असल्याचे दिसते. टेक्सासमधील डलास येथील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर एमआय न्यू यॉर्कविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात झाला. त्यात कर्णधार, फाफ डु प्लेसिसने (Faf du Plessis)एक शानदार शतकासह इतिहास रचला आहे.

फाफ डु प्लेसिसने 53 चेंडूत 5 चौकार आणि 9 षटकारांसह 103 धावा केल्या. एमएलसीच्या या हंगामातील हे त्याचे दुसरे शतक होते. त्याने काही दिवसांपूर्वी सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सविरुद्ध 100 धावा केल्या होत्या. 40 वर्षांचा झाल्यानंतरही दोन टी-20 शतके झळकावणारा इतिहासातील पहिला खेळाडू बनला आहे.

फाफ डु प्लेसिसने अनेक विक्रम मोडले

फॅफ डु प्लेसिसने आता 200 डावांमध्ये कर्णधार म्हणून 8 टी-20 शतके झळकावली आहेत. तो खेळाच्या सर्वात लहान स्वरूपात सर्वाधिक शतके झळकावणारा कर्णधार बनला आहे. त्याने मायकेल क्लिंगर आणि बाबर आझम यांचा विक्रम मोडला. ज्या दोघांनीही कर्णधार म्हणून 7 टी-20 शतके झळकावली आहेत.