
IND W vs ENG W 2025: भारत महिला विरुद्ध इंग्लंड महिला 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेचा दुसरा सामना उद्या म्हणजेच मंगळवार, 1 जुलै रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी आयसीसीने इंग्लंडला मोठा धक्का दिला आहे. पहिल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने इंग्लंडला मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावला (England Slow Over-Rate Fine) आहे. या सामन्यात यजमानांना 97 धावांचा मोठा पराभव स्वीकारावा लागला. आयसीसीच्या मते, इंग्लंड निर्धारित वेळेत पूर्ण 20 षटके टाकू शकला नाही, ते 2 षटके स्लो होते. त्यामुळे एमिरेट्स आयसीसी इंटरनॅशनल पॅनेलच्या मॅच रेफरी हेलेन पॅक यांनी हा दंड ठोठावला आहे.
आयसीसीने निवेदनात म्हटले आहे की, "खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार, जे किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आहे. खेळाडूंना निर्धारित वेळेत टाकण्यात अपयशी ठरलेल्या प्रत्येक षटकासाठी त्यांच्या सामन्याच्या शुल्काच्या पाच टक्के दंड आकारला जातो."
इंग्लंडची कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंटने शिक्षा स्वीकारली. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, इंग्लंडने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्यास जावे लागले. स्मृती मानधनाच्या ऐतिहासिक शतकाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाने 210 धावा केल्या. स्मृती मानधनाने पहिले शतक ठोकले आहे. तर ती तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे. मानधनाने 62 चेंडूत 112 धावांची खेळी केली. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 14.5 षटकांत 113 धावांवर सर्वबाद झाला.