IND vs AUS 3rd Test: तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाच्या 'या' खेळाडूच्या वडिलांचे झाले निधन, फोटो शेअर करत झाला भावुक
उमेश यादव (Photo Credits: Twitter/ICC)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 1 मार्चपासून इंदूरमध्ये (Indore) खेळवला जाणार आहे. या कसोटी मालिकेदरम्यान एक मोठी आणि दुःखद बातमी समोर आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादववर (Umesh Yadav) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उमेश यादव यांचे वडील टिळक यादव यांचे बुधवारी निधन झाले. त्यांचे वय 74 वर्षे होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती, त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयनेही (BCCI) शोक व्यक्त केला आहे आणि या ज्येष्ठ खेळाडूला मदतीचा हात पुढे केला आहे. उमेश यादवने आता वडिलांसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेली भावनिक पोस्ट

उमेश यादवने वडिलांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो वडिलांसोबत दिसत आहे. फोटो शेअर करताना उमेश यादवने लिहिले की, 'बाबा, तुमचा माझ्या खांद्यावर असलेला मार्गदर्शक हात नेहमीच माझ्यासोबत असेल. भगवान शिव तुमच्या आत्म्याला चिरशांती देवो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत उमेश यादव टीम इंडियाचा एक भाग आहे, मात्र त्याला अद्याप या मालिकेत खेळण्याची संधी मिळालेली नाही. (हे देखील वाचा: Virat Kohli Buys Luxury Villa: विराट कोहलीने अलिबागमध्ये खरेदी केला आलिशान बंगला; 'इतकी' आहे नवीन व्हिलाची किंमत)

 

View this post on Instagram

 

A post shared by Umesh Yaadav (@umeshyaadav)

तिसऱ्या कसोटी सामन्यातून पडू शकतो बाहेर 

या दु:खाच्या काळात उमेश यादवला संघाशी जोडलेले राहणे अवघड आहे, त्यामुळे तो तिसऱ्या कसोटीसाठी संघात सहभागी होऊ शकणार नाही. उमेशने भारताकडून बांगलादेशविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता ज्यात त्याने 7 विकेट्स घेतल्या होत्या. उमेश यादवने टीम इंडियासाठी आतापर्यंत 54 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 165 विकेट घेतल्या आहेत, तर त्याने भारतासाठी 75 एकदिवसीय आणि 9 टी-20 सामनेही खेळले आहेत.