
Digvesh Rathi Receives Fine and Demerit Points: लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. हा त्यांचा सवग दुसरा पराभव होता. पराभवानंतर संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नोटबुक स्टाईल सेलिब्रेशन केल्याबद्दल दिग्वेश राठीवर दंडात्मक कारवाई (Digvesh Rathi fine) करण्यात आली आहे. पंजाबने (PBKS) लखनऊ संघाचा 8 विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ संघाने 7 विकेट्स गमावत फक्त 171 धावा केल्या. प्रत्युत्तरात, पंजाबने 16.2 षटकांत 2 गडी गमावून 172 धावांचे लक्ष्य गाठले.
IPL 2025: Digvesh Rathi Receives Fine & Demerit Points For Notebook Style Celebration During LSG vs PBKS Match#IPL2025 #DigveshRathi #LSGvPBKS https://t.co/dIwYoZeArj
— Free Press Journal (@fpjindia) April 2, 2025
लखनऊ संघाचा गोलंदाज दिग्वेश सिंग राठी याला मोठी शिक्षा झाली आहे. त्याला त्याच्या सामना शुल्काच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलने ही माहिती दिली आहे. सामन्यादरम्यान, पंजाब किंग्जचा सलामीवीर प्रियांश आर्य याला बाद केल्यानंतर केलेल्या कृत्याबद्दल दिग्वेशला हा दंड ठोठावण्यात आला आहे. लखनऊच्या गोलंदाजाने प्रियांशची विकेट नोटबुक स्टाईलमध्ये साजरी केली. सामन्यातील पंचांना त्याची ही हरकत आवडली नाही. पंचांकडून दिग्वेशला इशाराही मिळाला आणि त्याला त्याच्या सामना शुल्काच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला.
आयपीएलचा हा सामना लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दिग्वेश सिंगला त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्याशिवाय एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. दिग्वेश सिंगने कलम 2.5 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा कबूल केला आहे. त्याशिवाय, दिलेली शिक्षा ही स्वीकारली आहे.