DC Vs MI IPL 2021 Match 13 Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल सामना लाईव्ह कधी, कुठे आणि कसा पाहणार? घ्या जाणून
दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (Photo Credit: File Image)

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील (IPL 14) 13व्या सामन्यात आज (20 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स संघ मुंबई इंडियन्स (Delhi Capitals Vs Mumbai Indians) आमने-सामने येणार आहेत. चेन्नईच्या (Chennai) एमए चिदंमबरम मैदानावर (MA Chidambaram Stadium) हा सामना खेळला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहेत. तर, मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधार पद रोहित शर्मा (Rohit Sharma) संभाळत आहे. भारतीय वेळेनुसार, सायंकाळी 7 वाजता टॉस होईल. तसेच 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. दिल्ली विरुद्ध मुंबई आयपीएल सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर लाईव्ह प्रसारित केला जाईल तर Disney+ Hotstar अ‍ॅप आणि वेबसाईटवर सामना लाईव्ह स्ट्रीम केला जाईल.

Disney+ Hotstar यंदा देखील आयपीएलचे स्ट्रीमिंग पार्टनर आहे. दिल्ली विरुद्ध मुंबई यांच्यातील आयपीएलचा 13वा सामना लाईव्ह प्रसारित करणार आहेत. आजचा सामना पाहण्यासाठी आपण आपल्या स्मार्टफोनवर Diseny+ Hotstar डाउनलोड करू शकता. दरम्यान, दोन्ही संघातील आजचा आयपीएलचा सामना लाइव्ह पाहण्यासाठी Android यूजर्ससाठी हॉटस्टार गुगल स्टोअरवर उपलब्ध असेल, तर Apple मोबाईल यूजर्ससाठी अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. हे देखील वाचा- Dilhara Lokuhettige: आयसीसीची मोठी कारवाई; श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू दिलहारा लोकुहेटिगेवर 8 वर्षांची घातली बंदी

संघ-

मुंबई इंडियन्स: क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, क्रुणाल पंड्या, राहुल चहर, अ‍ॅडम मिलने, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, पियुष चावला, धवल कुलकर्णी, सौरभ तिवारी, आदित्य तारे, ख्रिस लिन, नॅथन कुल्टर-नाईल, जयंत यादव, जेम्स नीशम, अनमोलप्रीतसिंग, अनुकुल रॉय, मोहसिन खान, अर्जुन तेंडुलकर, मार्को जानसेन, युधवीर सिंग

दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव्हन स्मिथ, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), मार्कस स्टॉयनिस, ललित यादव, ख्रिस वॉक्स, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, अवेश खान, लुकमान मेरीवाला, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा , उमेश यादव, अनिरुद्ध जोशी, सॅम बिलिंग्ज, टॉम करन, शिमरॉन हेटमीयर, प्रवीण दुबे, ऐनरिच नॉर्टजे, विष्णू विनोद, मणिमरण सिद्धार्थ, शम्स मुलाणी, रिपाल पटेल