इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या सत्राचा दुसरा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळला जात आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये दोन्ही संघांमधील सामना खेळला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिले फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने त्यांचे तीन विकेट स्वस्तात गमावले. दिल्लीने फक्त 13 धावांवर 3 विकेट गमावल्या. शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांनी दिल्लीकडून डावाची सुरुवात केली. दिल्लीने एका षटकात कोणतीही विकेट न गमावता 5 धावा केल्या, पण पुढच्याच ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर धवन रनआऊट झाला. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) टाकलेल्या चेंडूवर पंजाबचा कर्णधार राहुलने धवनचा कॅच सोडला, या दरम्यान धवन एक धाव घेण्यासाठी पुढे आला, पण पृथ्वीने त्याला मागे जाण्यास सांगितले नाही आणि चुकामुकीमुळे धवन धावबाद झाला. (IPL 2020 DC vs KXIP: केएल राहुलने टॉस जिंकत घेतला पहिले गोलंदाजीचा निर्णय, पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनमधून क्रिस गेल तर दिल्ली XI मधून अजिंक्य रहाणे Out)
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात धवनला भोपळाही फोडता आला नाही. टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या दिल्लीची सुरुवात खराब झाली. धवन पाठोपाठ पृथ्वी आणि नंतर शिमरॉन हेटमायर देखील स्वस्तात बाद झाले. आपल्या आवडत्या टीमची निराशाजनक सुरुवात पाहून नेटकरी देखील संतापले आणि सोशल मेडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
धवनच्या रनआऊटसाठी काहींनी पृथ्वीला जबाबदार मानले तर काहींनी टीमच्या खराब सुरुवातीवरून सलामी जोडीला सुनावले. पाहा दिल्लीच्या कामगिरीवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:
शिखर धवन इनिंग ब्रेकमध्ये पृथ्वी शॉच्या शोधात
Shikhar Dhawan looking for Prithvi Shaw in inning break. #DCvKXIP pic.twitter.com/MSloSLG6sn
— Pakchikpak Raja Babu (@HaramiParindey) September 20, 2020
आज हा मार खाणार
Prithvi Shaw aaj mast maar khayega Shikhar Dhawan se 🔪
— Avish Parmar (@Avishparmar27) September 20, 2020
मला माफ कर
Prithvi Shaw gets Shikhar Dhawan run out & then throws away his own wicket also. #DCvKXIP
Le Prithvi : pic.twitter.com/VkCFilGnTp
— AsliNaam_Definite (@Maria_KandaPoha) September 20, 2020
धवन पृथ्वीची वाट पहात आहेत
Shikhar Dhawan waiting for Prithvi Shaw #IPL2020 pic.twitter.com/9xb38nRMC1
— Sameer Allana (@HitmanCricket) September 20, 2020
धवन आणि पृथ्वी
Shikhar Dhawan to Prithvi Shaw in the dressing room #DCvKXIP #DCvsKXIP pic.twitter.com/Y1zbgFl8CQ
— Jitendra Jain (@JitendraJain_) September 20, 2020
शॉ...आळशी फलंदाज
Prithvi Shaw is always lazy batsman in IPL ! Dhawan RUN OUT !!
M02: DC vs KXIP – Shikhar Dhawan Wicket https://t.co/qcBbTR1FtD
— Bishnu Bibek (@bishnubbk) September 20, 2020
आयपीएलच्या 13व्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात पंजाबने टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय. पंजाबने आजच्या सामन्यासाठी 'युनिव्हर्स बॉस' क्रिस गेल याला वगळले. धवन पाठोपाठ तिसऱ्या ओव्हरमध्ये पृथ्वी देखील 5 धावा करत बाद झाला. शॉ बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर हेटमायरने षटकार लगावला, मात्र मोहम्मद शमीने त्या षटकाराचा बदला घेत पुढच्या चेंडूवर त्याची विकेट घेतली. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत सध्या क्रिझवर असून संघाची धावसंख्या सुधरवण्याच्या प्रयत्नात आहेत.