DC vs KKR, IPL 2020: कोलकाता नाईट रायडर्सचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, DCमध्ये रविचंद्रन अश्विनचे 'कमबॅक'
दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: File Image)

कर्णधार दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात आयपीएल (IPL) 2020 चा 16वा सामना आज शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. आजच्या सामन्यात केकेआरचा (KKR) कर्णधार कार्तिकने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सध्याच्या मोसमातील दोन्ही संघांचा हा चौथा सामना असेल. दिल्लीने खेळलेल्या त्यांच्या 3 पैकी दोन सामने जिंकले आहेत, तर एकामध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तीच स्थिती केकेआरचीही आहे. कोलकातानेही तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. आजच्या सामन्यासाठी केकेआरने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक तर दिल्लीने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. या सामन्यात सर्वांची नजर केकेआरचा अष्टपैलू आंद्रे रसेल आणि दिल्लीचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतवर असतील जे मोठे शॉट खेळण्यात मास्टर आहेत व या मैदानावर आजवर खेळलेल्या दोन सामन्यात मारलेल्या 62 षटकारांमध्ये वाढ करण्यास दोन्ही टीम सज्ज असतील. (How to Download Hotstar & Watch DC vs KKR Live Match: दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा)

दोन्ही टीमने आजच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केले आहेत. केकेआरने कुलदीप यादवच्या जागी राहुल त्रिपाठी, तर दिल्लीने अक्षर पटेलच्या जागी अनुभवी रविचंद्रन अश्विन आणि इशांत शर्माच्या जागी हर्षल पटेलला संधी दिली आहे. दिल्लीकडून दुखापतीमुळे दोन सामने गमावलेल्या अश्विनने प्लेइंग इलेव्हनमध्ये 'कमबॅक' केलं. दोन्ही संघांच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर दोन्ही संघांनी त्यांच्या तीन सामन्यांत अनुक्रमे दोन सामने जिंकले आहेत तर एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. आयपीएल गुणतालिकेत दिल्ली 4 गुणांसह तिसऱ्या, तर कोलकाता संघ 4 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

पाहा दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआरचा प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स: श्रेयस अय्यर (कॅप्टन), पृथ्वी शॉ, शिखर धवन,  रिषभ पंत (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, अमित मिश्रा, रविचंद्रन अश्विन, कगिसो रबाडा, इशांत शर्मा, एनरिच नॉर्टजे.

कोलकाता नाईट रायडर्स: दिनेश कार्तिक (कॅप्टन/विकेटकिपर), शुभमन गिल, सुनील नारायण, नीतीश राणा, आंद्रे रसेल, इयन मॉर्गन, पॅट कमिन्स, वरून चक्रवर्ती, शिवम मावी, राहुल त्रिपाठी आणि कमलेश नागरकोटी.