इकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम Photo credit : Twitter

आज लखनऊच्या इकाना स्टेडियमवर भारत विरूद्ध वेस्ट इंडिज संघांदरम्यान दुसरा टी 20 सामना रंगणार आहे. हा सामना जिंकत भारत संघ मालिकेवर वर्चस्व मिळावण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मात्र सामना रंगण्यापूर्वीच स्टेडियममुळेही भारत विरूद्ध वेस्ट इंडिज दुसरी टी 20 चर्चेचा विषय बनली आहे. सामन्यापूर्वी एक दिवस या स्टेडियमचं नाव बदलण्यात आलं आहे. आता इकाना स्टेडियमचं नाव भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असे करण्यात आले आहे.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची वैशिष्ट्यं

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विरूद्ध वेस्ट इंडिज हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाणार आहे.

नव्याने बांधण्यात आलेल्या या स्टेडियम पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना रंगत असल्याने नेमकी खेळपट्टी कशी असेल याचा नेमका अंदाज नाही. फलंदाजांसाठी हे अनुकूल असल्याचा अंदाज आहे मात्र धावांची संख्या कमी असेल असे क्युरेटर्सचं मत आहे.

या स्टेडियममध्ये एका वेळेस 50,000 चाहते क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेऊ शकणार आहे. आज राम नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांसोबत अनेक कॅबिनेट मंत्री खेळाचा आनंद लूटण्यासाठी स्टेडियममध्ये हजेरी लावणार आहेत.

अत्याधुनिक सेवा सुविधांनी हे स्टेडियम सज्ज आहे. या स्टेडियमच्या मैदानावर 9 पीचेस आहेत.

 

कधी आणि कुठे पहाल भारत विरूद्ध वेस्ट इंडिज 2 री T20

भारत विरूद्ध वेस्ट इंडिज दरम्यान खेळला जाणारा हा दुसरा सामना आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. हा सामना टेलिव्हिजनवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे. तर हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार आहे.