ऑस्ट्रेलिया (Australia) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघातील पहिल्या टी-20 मॅचमध्ये शानदार खेळ करत डेविड वॉर्नर (David Warner) याने प्रेक्षकांची मनं जिंकली. श्रीलंकाविरुद्ध सध्या सुरु असलेल्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात वॉर्नरने नाबाद शतक केले. हे वॉर्नरच्या टी-20 करिअरमधील पहिले शतक होते. वॉर्नरने आधी एरोन फिंच आणि नंतर ग्लेन मॅक्सवेल याच्या साथीने चांगली भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकासमोर 223 धावांचा मोठा लक्ष्य ठेवला. त्यानंतर गोलंदाजांनी दमदार कार्य करत श्रीलंकेला 9 बाद 99 धावांवर रोखले. वॉर्नरने यात महत्वाची भूमिका बजावली. वॉर्नरने आपल्या फलंदाजीने चाहत्यांची मनं जिंकली. दोन्ही संघातील पुढील सामना उद्या, 30 ऑक्टोबरला गाब्बा स्टेडियममध्ये खेळला जाईल. त्याआधी ऑस्ट्रेलिया संघाने गाब्बामध्ये खूप मेहनत केली. आणि यादरम्यान वॉर्नरचे एक हृदयस्पर्शी जेस्चर पाहून सोशल मीडिया यूजर्स भारावून गेले. (AUS vs SL 1st T20I: कसुन रजिता याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवला नकोसा रेकॉर्ड, 4 ओव्हरमध्ये लुटवल्या इतक्या धावा)
वॉर्नर, जो आपला 33 वा वाढदिवस साजरा करीत होता, त्याने नकळत सराव स्तरातून बाहेर जाताना नकळत आपले ग्लोव्हज भेट देऊन एका युवा चाहत्याचा दिवस बनविला. ड्रेसिंग रूमकडे जात असताना वॉर्नरने आपले ग्लोव्हजची जोडी तरुण फॅनकडे दिले जो हातात एक बँक्स घेऊन स्टँड्समध्ये उभा होता. www.cricket.com.au वर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये पहिले तो युवा चाहता वॉर्नरचे ग्लोव्हज मिळालेले पाहून खूपच भारावून गेलेला दिसत होता. पहा याचा व्हिडिओ:
These young fellas won't ever forget their trip to the cricket today. All class from @davidwarner31 👏 #AUSvSL pic.twitter.com/3z57vgwuS9
— cricket.com.au (@cricketcomau) October 27, 2019
पुढच्या वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी श्रीलंकेविरुद्ध 33 वर्षीय डेव्हिड वॉर्नरने शानदार शतक झळकावले. वॉर्नरने 56 चेंडूत शतक ठोकले. वॉर्नरने पहिल्या टी-20 शतकात 8 चौकार आणि 3 षटकार लगावले. यादरम्यान, वॉर्नरने 56 चेंडूंच्या डावात 10 चौकार आणि चार षटकार ठोकले. ऑस्ट्रेलियाकडून टी-२० मध्ये शतक झळकावणारा वॉर्नर चौथा फलंदाज ठरला. त्यांच्याआधी ग्लेन मॅक्सवेल, एरोन फिंच आणि शेन वॉटसन यांनी ही कामगिरी केली आहे. पहिल्या विकेटसाठी वॉर्नरने कर्णधार अॅरोन फिंचबरोबर 122 धावांची दंडवत भागीदारी केली.