Darren Sammy on Racism: डॅरेन सॅमीने माजी SRH संघावर लगावले वर्णद्वेषाचे आरोप, व्हिडिओद्वारे साथीदारांचा पर्दाफाश करण्याची दिली धमकी
डॅरेन सॅमी (Photo Credit: Getty Images)

वेस्ट इंडीजचा (West Indies) वर्ल्ड कप विजेता माजी कर्णधार डॅरेन सॅमी (Darren Sammy)  याने आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad)  माजी साथी खेळाडूंवर वंशवाद टिप्पणी केल्या असल्याचा पर्दाफाश करण्याची चेतावणी दिली आहे. सॅमीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबाद संघावर वंशभेदाचा आरोप आहे. गेल्या आठवड्यात, 'काळू' या शब्दाचा अर्थ समजल्यानंतर सॅमी खूप संतापला होता. तो म्हणाला की, इंडियन प्रीमियर लीग (IPL) दरम्यान मला आणि श्रीलंकेचा क्रिकेटर थिसारा परेरा (Thisara Parera) यांना 'कालू' म्हटले जायचे. आता मला या शब्दाचा अर्थ समजला आहे आणि मला खूप राग आला आहे. तथापि, त्यावेळी त्याने कुणाचे नाव घेतले नव्हते, मात्र आता त्याने व्हिडिओद्वारे खेळाडूंचा पर्दाफाश करण्याची धमकी दिली. सॅमीने 2013 मध्ये हैदराबाद संघाकडून आयपीएलची सुरुवात केली होती आणि नंतर त्याला संघाचे कर्णधापद देण्यात आले होते.(George Floyd Death: डॅरेन सॅमी याची वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून ICC कडे मागणी, क्रिकेट मंडळांनीही केले आवाहन)

सॅमीने वंशविवादाच्या विषयावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने म्हटले की मला हा शब्द वापरणाऱ्या सर्व लोकांना मी संदेश देऊ इच्छितो. सॅमी म्हणाला, "मी जगभर क्रिकेट खेळले आहे आणि बर्‍याच लोकांवर माझे प्रेम आहे. मी जिथे खेळलो तेथे सर्व ड्रेसिंग रूम्स मी अंगीकारली आहेत. म्हणून त्यांच्या संस्कृतीतले काही लोक काळ्या लोकांचे वर्णन कसे करतात याबद्दल मी हसन मिन्हाजला ऐकत होतो." व्हिडिओ शेअर करताना सॅमीने कॅप्शनमध्ये लिहिले, "ज्ञान ही सामर्थ्य आहे. म्हणूनच मला अलीकडेच एक शब्द सापडला ज्याने मला बोलावले जात होते जे खरंच म्हणायचे नव्हते, मला काही उत्तरांची आवश्यकता आहे. म्हणून मी नावं सांगण्यास सुरूवात करण्यापूर्वी या व्यक्तींनी समोर यावे आणि कृपया मला सांगा की त्या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे आणि जेव्हा मला ते मला म्हणायचे तेव्हा ते सर्व प्रेमाने होते."

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयडच्या हत्येनंतर सॅमीने वंशवादाबद्दल उघडपणे भाष्य केले. तत्पूर्वी, वेस्ट इंडियन खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि जगभरातील क्रिकेट बोर्डांना वंशविद्विरूद्ध लढा देण्याचे आवाहन केले होते..