रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

CSK vs KKR, IPL 2022: चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आयपीएल (IPL) 2022 चा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. 15 व्या मोसमातील या सलामीच्या सामन्यात कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर रवींद्र जडेजा चेन्नई संघाचे नेतृत्व करत आहे. चेन्नई सुपर किंग्जने या सामन्यात डेव्हन कॉन्वे, ड्वेन ब्रावो, एडम मिल्ने आणि मिचेल सॅंटनर यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. दुसरीकडे सॅम बिलिंग्ज, सुनील नारायण आणि आंद्रे रसेल हे कोलकाता नाईट रायडर्सच्या परदेशी खेळाडूंमध्ये खेळताना दिसणार आहेत. म्हणजेच केकेआर संघ 8 भारतीय खेळाडूंसोबत मैदानात उतरला आहे. (CSK vs KKR, IPL 2022: चेन्नईची फलंदाजी गडगडली, रसेलने शिवम दुबे याला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता; MS Dhoni मैदानात)

आयपीएलच्या सलामीच्या सामन्याच्या तोंडावर चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनी याने नेतृत्व राजीनामा देत जडेजा याच्याकडे संघाची कमान सोपवली. मात्र आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करण्यासाठी जडेजाला सर्वाधिक प्रतीक्षा करावी लागली आहे. कर्णधार म्हणून डेब्यू करण्यापूर्वी सर्वाधिक आयपीएल सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये जडेजा अव्वल स्थानावर आहे. ‘सर’ जडेजा 200 आयपीएल सामने खेळल्यानंतर प्रथमच संघाचे नेतृत्व करत आहे. त्याने 2012 मध्ये आयपीएलमध्ये पहिला सामना खेळला आणि जडेजाला कर्णधार बनण्यासाठी तब्ब्ल 10 वर्षे लागली. धोनी आणि सुरेश रैना यांच्यानंतर अष्टपैलू जडेजा चेन्नईचा चेन्नईचे नेतृत्व करणारा तिसरा कर्णधार आहे. जडेजाआधी मनीष पांडे 153 सामने, किरॉन पोलार्ड 137 सामने, रविचंद्रन अश्विन 111 सामने, संजू सॅमसन 107 सामने आणि भुवनेश्वर कुमार याने आयपीएल कर्णधार म्हणून पदार्पण करण्यापूर्वी 103 सामने खेळले आहेत.

IPL 15 च्या पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे तर KKR कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खराब झाली. संघाचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड शून्यावर आणि कॉन्वे फक्त 3 धावाच करू शकला. यानंतर रॉबिन उथप्पा 21 चेंडूत 28 धावा आणि अंबाती रायुडू 15 धावा माघारी परतले.