रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

CSK Probable Playing XI: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामाचा बिगुल वाजला आहे. पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि गेल्या वर्षीचे उपविजेता कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईला नवा कर्णधार मिळाला आहे. एमएस धोनी (MS Dhoni) याने KKR विरुद्ध पहिल्या सामन्यापूर्वी कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निणर्य घेत अष्टपैलू रवींद्र जडेजा  (Ravindra Jadeja) याच्याकडे कमान सोपवली. तसेच यापूर्वी गोलंदाजी अष्टपैलू दीपक चाहर दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांमध्ये भाग घेऊ शकणार नाही. तर मोईन अली सलामीच्या सामन्यासाठी वेळेपूर्वी भारतात पोहचू शकला नाही. तसेच आयपीएल (IPL) 2022 च्या लिलावानंतर सर्व सर्वांचे चित्र बदलले आहे आणि चेन्नईचे देखील याला अपवाद नाही. अशा परिस्थितीत आता जडेजा ब्रिगेड पहिल्या सामान्यांपासून नवीन प्लेइंग इलेव्हन सोबत मैदानात उतरणार आहे. (IPL 2022 पूर्वी MS Dhoni याचा धमाका, रवींद्र जडेजा याच्याकडे सोपवली CSK संघाची कमान)

चेन्नईने 6 कोटी रुपयात रिटेन केलेला 24 वर्षीय युवा फलंदाज ऋतुराज पुन्हा एकदा संघासाठी सलामीला उतरेल. मात्र यावेळी फाफ डु प्लेसिस त्याच्या सोबत नसून न्यूझीलंडचा खतरनाक टी-20 फलंदाज डेव्हॉन कॉन्वे आयपीएलमध्ये पदार्पण करेल. टी-20 क्रिकेटमध्ये कॉन्वेचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. अशा परिस्थितीत या हंगामात कॉन्वे आणि गायकवाड, ही जोडी सीएसकेसाठी सलामीला उतरेल. रॉबिन उथप्पा तिसऱ्या क्रमांकावर खेळेल अशी अपेक्षा आहे. गेल्या मोसमात संधी मिळताच त्याने काही चांगल्या खेळी खेळल्या. यानंतर अंबाती रायुडू चौथ्या क्रमांकावर खेळणे अपेक्षित आहे. यानंतर रवींद्र जडेजा आणि एमएस धोनी मॅच फिनिशर्सच्या भूमिकेत दिसतील.

याशिवाय गोलंदाजी विभागात संघासाठी धक्का म्हणजे दीपक चाहर याची अनुपस्थितीत आहे. गोलंदाजी विभागात अष्टपैलू ड्वेन ब्रावो आणि अॅडम मिल्ने वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील. तर अंडर-19 विश्वचषकचा स्टार राजवर्धन हंगरगेकर यालाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान या वर्षी CSK च्या संघात अनेक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि हीच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे.

CSK संभाव्य इलेव्हन:  रवींद्र जडेजा (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉन्वे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, एमएस धोनी (विकेटकीपर), ड्वेन ब्रावो, राजवर्धन हंगरगेकर, ख्रिस जॉर्डन, आणि अॅडम मिल्ने.