CSK IPL 2021 Full Schedule: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14व्या सत्रात चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) पहिला सामना 10 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होईल. इंडियन प्रीमियर लीगचा मागील हंगाम सुपर किंग्जसाठी संस्मरणीय राहिला नाही. आयपीएलच्या (IPL) इतिहासात पहिल्यांदा संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही. यंदा संघाला पुन्हा एकदा जुना रंग परत मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 2020 मध्ये चेन्नई 12 गुणांसह 7व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. संघाने 14 पैकी 6 सामने जिंकले होते. मात्र, यंदा फ्रँचायझीने आयपीएलच्या लिलावात (IPL Auction) संघ संयोजन निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे. कोविड-19 प्रकरणे आणि सुरेश रैनाच्या अनुपस्थितीत संघाच्या संयोजनाविषयी आणि संघाच्या सामर्थ्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. (Mumbai Indians IPL 2021 Full Schedule: मुंबई इंडियन्स पहिल्याच सामन्यात ‘विराटसेने’शी करणार दोन हात, जाणून घ्या रोहित शर्माच्या ‘पलटण’चे संपूर्ण वेळापत्रक)
पहा चेन्नई सुपर किंग्सच्या इंडियन प्रीमियर लीग 2021चे संपूर्ण वेळापत्रक
10 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई, संध्याकाळी 7.30
16 एप्रिल - पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई, संध्याकाळी 7.30
19 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, मुंबई, संध्याकाळी 7.30
Ready ah... vaanga pa... summer coming! Block the #Yellove dates! #WhistlePodu #IPL2021 🦁💛 pic.twitter.com/k8RI1P6Q8o
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 7, 2021
21 एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई, संध्याकाळी 7.30
25 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई, दुपारी 3.30
28 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली, संध्याकाळी 7.30
1 मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली, संध्याकाळी 7.30
5 मे - राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली, संध्याकाळी 7.30
07 मे - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली, संध्याकाळी 7.30
09 मे - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज, बेंगलोर, दुपारी 3.30
12 मे - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, बेंगलोर, संध्याकाळी 7.30
16 मे - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, बेंगलोर, संध्याकाळी 7.30
21 मे - कॅपिटल विरुद्ध वि चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता, संध्याकाळी 7.30
23 मे - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता, संध्याकाळी 7.30
असा आहे चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2021 संघ
महेंद्र सिंह धोनी (कॅप्टन), सुरेश रैना, अंबाती रायडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, एन जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एनगीडी, मिचेल सॅटनर, रवींद्र जडेजा, रुतूराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, सॅम कुरन, जोश हेजलवुड, आर साई किशोर, रॉबिन उथप्पा, मोईन अली, कृष्णाप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, के भगत वर्मा, हरी निशांत.