क्रिकेटर अशोक डिंडा (Ashok Dinda) ह्याला सोमवारी कोलकाता (Kolkata) येथील ईडन गार्डन (Eden Garden) येथे सुरु असलेल्या सरावाच्या सामन्यादरम्यान चेंडू चेहऱ्याला जोरात लागून गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी डिंडा ह्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खरंतर त्यानेच फेकलेल्या चेंडूवर शॉट मारला असता तो चेंडू त्याच्या चेहऱ्यावर लागून डिंडा तेथेच खाली पडला.
मीडिया रिपोर्टनुसार, डिंडा ह्याला उपचारासाठी पाठवण्यात असून त्याबाबत अद्याप त्याच्या प्रकृतीबाबत सांगण्यात येत नाहीये. तसेच चिंता करण्याचे कारण नसल्याचे ही बोलले जात आहे. बंगाल क्रिकेटर असोशिएशनच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला असे सांगितले की, चिंतेचे काही कारण नसून त्याला आरामाची गरज असल्याचे म्हटले आहे.
— Abhishek kumar (@stepwithabhi) February 11, 2019
नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफीमध्ये डिंडा ह्याने बंगालसाठी सर्वात जास्त 8 क्रिकेट सामनादरम्यान 28 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच भारतीय संघासाठी सुद्धा डिंडा खेळला आहे.