Video: क्रिस गेलने स्वीकारले #StayAtHome चॅलेंज, सुपर हिरो सूट परिधान करून जिममध्ये केली कसरत
क्रिस गेल (Photo Credit: Twitter/VideoScreenGrab)

कोरेना व्हायरसच्या (Coronavirus) प्रसारा दरम्यान #StayAtHomeChallenge मध्ये सामील होणाऱ्या स्टार क्रिकेटपटू क्रिस गेल (Chris Gayle) ही सामील झाला आहे. युनिव्हर्स बॉस गेलने त्याच्या स्वतःच्या विशिष्ट शैलीत जिममध्ये कसरत केली. कोरोना व्हायरसमुळे सध्या विश्वातील अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे. चित्रपटांच्या शूटिंग, राजकीय मेळावे आणि क्रीडा विश्वातील अनेक मालिका रद्द तर काहींच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्वांना घरी राहण्याचे आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचा सल्ला सरकारकडून देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सर्व जग आपल्याच घरी अडकून राहिले आहे. आगामी काळात कोणत्याही मोठ्या मालिका खेळवला जाणार नसल्याने क्रिकेटपटूही घरी आहेत आणि घरी राहून कुटुंबासोबत वेळ व्यतीत करताना दिसत आहे. कोरोनामुळे जिम बंद झाल्याने अनेक क्रिकेटपटू वेगवेळ्या पद्धतीने कसरत आहेत. (Coronavirus मुळे BCCI अध्यक्ष सौरव गांगुली मिळाली दुर्मिळ सुट्टी, शेअर केली फ्री टाइम सेल्फी पोस्ट, पाहा पोस्ट)

गेलनेही अशा अनोख्या पद्धतीने कसरत केली. गेलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो सुपरहिरो सारखा सूट परिधान केलेला दिसत आहे. तोंडावर त्याने मास्क लावला आहे. गेल सोशल मीडियावर शेअर केलेल्या शॉर्ट क्लिपमध्ये पुश-अप, वजन उचलताना दिसत आहे. पाहा हा व्हिडिओ:

कोरोना व्हायरसचा संपूर्ण विश्वभर परिणाम होत असताना जगभरातील क्रीडा तार्‍यांनी त्यांच्या चाहत्यांना सुरक्षित आणि घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. बुधवारी जागतिक कोरोनाव्हायरस संक्रमणाची संख्या 2,00,000 च्या वर पोहचली आहे. युरोप, उत्तर अमेरिका आणि आशियामधील सरकारांनी जीवघेणा साथीच्या रोगाचा तीव्रतेने होणाऱ्या प्रसारावर ब्रेक लावण्यासाठी कठोर उपाय योजले. बुधवारी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने स्वतःचा गार्डनमध्ये सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केला. कोरोना व्हायरसच्या आजाराने क्रीडा दिनदर्शिकेला चांगलाच फटका बसला असला तरी जगभरातील खेळाडू आपापल्या पद्धतीने तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. एनबीए, प्रीमियर लीग, यूफा चॅम्पियन्स लीगसह जगभरातील स्पोर्टिंग लीग स्थगित करण्यात आले आहेत. भारतात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 15 एप्रिलपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.