भारतीय क्रिकेट संघ उद्या, शुक्रवारपासून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना (IND vs AUS 2nd Test) ऑस्ट्रेलियाशी खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला होता. आता दिल्लीत (Delhi) खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी एक मोठा खुलासा केला आहे. द्रविडने सांगितले की, दिल्ली कसोटीसाठी एक खेळाडू संघाच्या प्लेइंग 11 मध्ये एंट्री घेणार आहे. (हे देखील वाचा: Test क्रमवारीत बदल केल्याने ICC ट्रोल, भारताने अव्वल स्थान गमावले)
राहुल द्रविडचा मोठा खुलासा
द्रविड जो खेळाडू संघात पुनरागमन करणार आहे तो दुसरा कोणी नसून श्रेयस अय्यर आहे. फिटनेसच्या समस्येमुळे अय्यर नागपुरातील पहिली कसोटी खेळू शकला नाही. पण आता हा खेळाडू तंदुरुस्त आहे आणि प्रशिक्षक द्रविडलाही अय्यरला टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये पाहायचे आहे. तो म्हणाला, “एखाद्याने दुखापतीतून पुनरागमन करणे केव्हाही चांगले असते. दुखापतीमुळे खेळाडू गमावणे आम्हाला आवडत नाही. तो परत आला आहे आणि तंदुरुस्त आहे याचा मला आनंद आहे. त्याचे आज एक लांब सत्र होते, त्याने काही प्रशिक्षण घेतले आहे. जर तो तंदुरुस्त आणि तयार असेल तर कोणतीही शंका न घेता त्याच्या भूतकाळातील कामगिरीनुसार तो थेट 11 मध्ये प्रवेश करेल.”
बाहेर कोण जाणार?
टेस्ट फॉरमॅटमध्ये श्रेयस अय्यर टीम इंडियाचा अविभाज्य भाग आहे. त्याने गेल्या वर्षी कसोटीत 60 च्या सरासरीने धावा केल्या. पण प्रश्न असा पडतो की अय्यर जर परत आला तर बाहेर कोण बसणार? तो खेळाडू सूर्यकुमार यादव असेल. सूर्याने टी-20 फॉरमॅटमध्ये नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. पण एकदिवसीय आणि कसोटीत तो स्वत:ला सिद्ध करू शकलेला नाही. शेवटच्या कसोटीत सूर्या खराब शॉट खेळून अवघ्या 8 धावांवर बाद झाला. अशा स्थितीत अय्यर परतल्यावर या फलंदाजाला पुन्हा एकदा बाकावर बसावे लागू शकते.
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव आणि रवींद्र जडेजा.