टीम इंडिया (Photo: IANS)

'कॉफी विथ करण' (Koffe with Karan) मधील हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्या वादग्रस्त विधानाचे प्रकरण आता न्यायालयात जाऊन पोहचले आहे. त्यामुळे आता बीसीसीआय(BCCI) ने वरिष्ठ खेळाडूंसह सर्व वयोगटातील संघाना आणि भारतीय A संघातील खेळाडूंना शिस्तीचे धडे लवकरच देण्यात येणार आहेत.

भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू, A संघातील खेळाडू आणि 19 वर्षाखालील खेळाडूंना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत शिस्तीचे धडे दिले जाणार आहे. या मध्ये खेळाडूंना एखाद्याशी कसे वागावे किंवा बोलावे या पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच लिंग संवेदनशीलता यावरही वेगळे सत्र खेळाडूंसाठी घेण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. मात्र लिंग संवेदनशील सत्र वेगळे भरवणार का यावर अजून उत्तर देण्यात आलेले नाही.

परंतु हार्दिक पांड्या आणि केएल राहुल हे सुद्धा लिंग संवेदनशील सत्रात उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. तर येत्या आयपीएल क्रिकेट सामन्यातील संघांसाठी खेळाडूंवर लाखो-करोडो रुपयांची बोली लावून खरेदी केलेल्या क्रिकेटपटूंच्या डोक्यात हवा जाऊ नये म्हणून अशा पद्धतीचे प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे एका माजी क्रिकेटपटूने सांगितले आहे.