PBKS vs CSK (Photo Credit: X)

CSK vs PBKS 49th Match: आयपीएल 2025 च्या 49 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) आमनेसामने येणार आहेत. हा सामना चेन्नईचा बालेकिल्ला असलेल्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळवला जात आहे. चेन्नईला 9 पैकी फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. सीएसके 4 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्ज 9 सामन्यांत5 विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत, पंजाब संघ चेन्नईच्या खराब फॉर्मचा फायदा घेऊन पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान मजबूत करू इच्छितो. दरम्यान, पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने पंजाबसमोर 191 धावांचे लक्ष्ये ठेवले आहे.

सॅम करनची 88 धावांची शानदार खेळी

प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण संघ 19.2 षटकांत 190 धावा करून सर्वबाद झाला. चेन्नई सुपर किंग्जकडून स्टार युवा अष्टपैलू सॅम करनने 88 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, सॅम करनने 47 चेंडूत नऊ चौकार आणि चार षटकार मारले. सॅम करन व्यतिरिक्त, धोकादायक फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसने 32 धावा केल्या.

युजवेंद्र चहलने घेतली हॅट्रिक 

दुसरीकडे, घातक वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पंजाब किंग्ज संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. पंजाब किंग्जकडून स्टार गोलंदाज युजवेंद्र चहलने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. या सामन्यात युजवेंद्र चहलने हॅट्रिक घेतली आहे. युजवेंद्र चहल व्यतिरिक्त अर्शदीप सिंग आणि मार्को जॉन्सन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी पंजाब किंग्ज संघाला 20 षटकांत 191 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.