Champions Trophy 2025: भारताविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात (Australia Cricket Team) शेवटच्या क्षणी त्यांच्या संघात बदल करण्यात आला आहे. सलामीवीर मॅथ्यू शॉर्टच्या जागी कूपर कॉनोली याला संघात स्थान देण्यात आले आहे. शुक्रवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान शॉर्टला पायाच्या हाडांना दुखापत झाली. त्यानंतर हे बदल करण्यात आले आहेत.

जेक फ्रेझर-मॅकगर्कला संधी मिळू शकते

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने दोन दिवसांपूर्वी सांगितले की, उपांत्य सामन्यापूर्वी त्याला सावरण्यास अडचण येईल. शॉर्टच्या अनुपस्थितीत, जेक फ्रेझर-मॅकगर्क भारताविरुद्धच्या अंतिम अकरा संघात असण्याची अपेक्षा आहे. मात्र, कॉनोली संघात सामील झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया आता कोणता दृष्टिकोन स्वीकारेल हे पाहणे बाकी आहे. ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया यांच्यात 4 मार्च रोजी दुबई येथे चॅम्पियन्स ट्रॉफीचा उपांत्य फेरी सामना होणार आहे.

कॉनोलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

कॉनोलीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी सहा आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन एकदिवसीय आहेत. कॉनोली हा डावखुरा फलंदाज आहे. तो फिरकी गोलंदाजी देखील करतो.

भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅलेक्स केरी, कूपर कॉनोली, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, अ‍ॅडम झांपा.