रिषभ पंत आणि केएल राहुल (Photo Credit: IANS)

न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) मालिकेच्या पहिल्या टी-10 सामन्यात भारतीय संघाने (India) प्लेइंग इलेव्हनमध्ये यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) ला स्थान दिले नाही. त्याच्या जागी केएल राहुल (KL Rahul) याला फलंदाजीसोबत विकेटच्या मागे अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॅटिंग आणि विकेटकिपिंगने प्रभावी खेळ केल्यानंतर राहुलला विकेटच्या मागची जबाबदारी देण्यात आली आहे. व्यवस्थापनाने पंतला बराच काळ पाठिंबा दर्शविला पण फलंदाजी आणि विकेटकिपिंगने त्याच्या फॉर्ममध्ये काही सुधार न केल्याने तो आधीच चाहत्यांच्या आणि क्षेत्रातील तज्ज्ञांच्या नजरेत आणले होते. खुद्द भारतीय कर्णधार विराट कोहली यानेही राहुलला पहिल्या टी-20 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध विकेटकिपिंगची जबाबदारी दिली. कोहलीच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर चाहत्यांना एक मोठी संधी दिली आणि त्यांनी पंतला मजेदार शैलीत ट्रोल करण्यास सुरुवात केली.

आयसीसी विश्वकरंडक 2019 च्या समाप्तीनंतर पंतने विकेटकीपर धोनीची जागा घेतली. संघाच्या व्यवस्थापनाने त्याला सर्व फॉर्मेटमध्ये बरीच संधी दिली, मात्र तो संधीचा पूर्ण फायदा करून घेऊ शकला नाही. राहुलच्या नुकत्याच झालेल्या कामगिरीमुळे टीम इंडियासाठी एक नवीन मार्ग उघडला आहे, ही वस्तुस्थितीही कोहलीने पुन्हा पुन्हा बोलून दाखविली. पंतला न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यातून डच्चू दिल्यावर यूजर्सने अश्या प्रकारे दिली प्रतिक्रिया: 

पंत केएल राहुलबद्दल विचार करताना

करिअर संकटात आहे

लाज नाही वाटत

विराटच्या वक्तव्यानंतर

पंत, राहूलकडे पाहताना

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पंतला दुखापत झाल्यावर मिलेल्या संधीचा राहुलने पूर्ण फायदा करून घेतला. त्याने आपल्या कीपिंगद्वारे पाच फलंदाज बाद केले. फलंदाजीच्या क्रमवारीची स्थिती विचारात न घेता सध्या 27-वर्षीय राहुल अपवादात्मक फॉर्मात आहे. राजकोट येथे झालेल्या दुसर्‍या सामन्यात राहुलने 52 चेंडूत 80 धावांची शानदार खेळी केली.