Canada National Cricket Team vs Nepal National Cricket Team: कॅनडा राष्ट्रीय क्रिकेट संघ (CAN) विरुद्ध नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघ (NEP) टी-20 तिरंगी मालिका 2024 चा पहिला सामना मेपल लीफ नॉर्थ वेस्ट मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता सामना खेळवला जाईल. टी-20 मध्ये अलीकडचा फॉर्म लक्षात घेता दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना असणार आहे. कॅनडाने शेवटच्या पाच सामन्यांमध्ये एक गेम जिंकला. ज्यामध्ये दोन सामने झाले नाहीत आणि दोन सामन्यात पराभव झाला आहे. गेल्या पाच सामन्यांमध्ये, त्यांनी नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात एकमेव विजय नोंदवला. अलीकडेच त्यांचा अमेरिकेविरुद्ध 20 धावांच्या फरकाने पराभव झाला. घरच्या तिरंगी मालिकेत विजयाने सुरुवात करण्याचा त्यांचा विचार आहे. (हेही वाचा: CAN vs NEP 1st T20I Tri-Series 2024 Preview: टी-20 तिरंगी मालिकेच्या पहिल्या सामन्यात नेपाळ कॅनडा आमनेसामने, हेड टू हेड, लाईव्ह स्ट्रीमिंगसह सर्व माहिती घ्या जाणून)
नेपाळ (NEP) बद्दल बोलयचे झाले तर. त्यांनी पुरुषांच्या टी-20 विश्वचषक 2024 मध्ये शेवटचा टी-20 खेळला. गेल्या पाच सामन्यांमध्ये नेपाळने चार सामने गमावले असून त्यातील एक सामना रद्द झाला आहे.
नेपाळ विरुद्ध कॅनडा टी-20 तिरंगी मालिकेतील पहिला सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
कॅनडा राष्ट्रीय क्रिकेट संघ (CAN) विरुद्ध नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघ (NEP) टी-20 तिरंगी मालिका 2024 मधील पहिला सामना 28 सप्टेंबर (शनिवार) रोजी मॅपल लीफ नॉर्थ-वेस्ट ग्राउंड, किंग सिटी येथे भारतीय वेळेनुसार रात्री 9:30 वाजता खेळवला जाणार आहे.
नेपाळ विरुद्ध कॅनडा टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्याचे थेट प्रक्षेपण कोठे पहाल?
भारतात कॅनडा विरुद्ध नेपाळ टी-20 ट्राय सिरीज 2024 सामन्याच्या अधिकृत प्रसारणाबाबत कोणतीही माहिती नाही. त्यामुळे चाहत्यांना हा सामना लाईव्ह टीव्हीवर पाहता येणार नाही.
नेपाळ विरुद्ध कॅनडा टी-20 तिरंगी मालिका पहिल्या सामन्याचे थेट प्रक्षेपण कोठे आणि कसे पहाल?
कॅनडा विरुद्ध नेपाळ टी-20 मालिका 2024 सामन्याच्याबद्दल कोणतीही माहिती नाही. फॅनकोड ॲप त्याचे स्ट्रीमिंग प्रदान करेल अशी अपेक्षा आहे. परंतु त्यावर कोणतेही अधिकृत विधान जारी केले गेले नाही.