बीसीसीआय (Photo Credits: IANS)

यावेळी आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 चे आयोजन करत आहे. पण बांगलादेशात आरक्षणाच्या आंदोलनामुळे देशात खळबळ उडाली आहे. त्यामुळे बांगलादेश टी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद गमावू शकते. महिलांची ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धा या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांगलादेशात नियोजित आहे. मात्र, सध्या तेथील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. बांगलादेशातील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर, (हेही वाचा - Pak VS Ban Karachi Test: पाकिस्तान आणि बांगलादेशमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांना प्रवेश नाही; तिकीटांचे पैसे परत मिळणार)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) महिलांच्या ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) विचारणा केली होती. मात्र, आपण हा प्रस्ताव फेटाळून लावल्याचे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी सांगितले. आपल्याकडे ऑक्टोबरमध्ये मान्सून सुरू असेल. तसेच पुढील वर्षी महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धाही भारतात होणार आहे. त्यामुळे सलग दोन विश्वचषकांचे आयोजन करण्यास आम्ही उत्सुक नाही असे स्पष्टीकरण यावर जय शहा यांनी दिले आहे.

बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या आयोजनाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परिस्थिती चिंताजनक आहे आणि आयसीसी देखील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जर परिस्थिती लवकर सुधारली नाही तर आयसीसी या प्रकरणी मोठा निर्णय घेऊ शकते. ही स्पर्धा 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान 2 मैदानांवर खेळली जाणार आहे.