IPL 2020 अनिश्चित काळासाठी स्थगित;  Coronavirus संकटाच्या पार्श्वभुमीवर BCCI चा निर्णय, क्रिकेट चाहत्यांना धक्का
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: IANS)

भारतात कोरोना व्हायरसची (Coronavirus) स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनचा अवधी 3 मे पर्यंत वाढवला आहे. यामुळे आता सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगही (Indian Premier League) पुढील आदेश येईल तोवर स्थगित करण्यात आली आहे. बीसीसीआय सचिव जय शाह (Jay Shah) यांनी स्वतः याची पुष्टी केली. आयपीएल चाहत्यांसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने राबविलेल्या लॉकडाउनमुळे बीसीसीआयच्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने आयपीएलचे 2020 सत्र पुढील सूचना येईपर्यंत स्थगित करण्यात चा निर्णय घेतला आहे. यापूर्वी आयपीएल (IPL) 29 मार्चपासून आयोजित करण्यात येणार होती, मात्र देशात कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यानंतर 15 एप्रिलपर्यंत स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. या दरम्यान विमानसेवाही रद्द करण्यात आल्या होत्या ज्यामुळे परदेशी खेळाडूंना बंदी घालण्यात आली होती. (On This Day: आजच्या दिवशी सचिन तेंडुलकरने झळकावले आयपीएलमधील पहिले शतक, कोची टस्कर्स केरळविरुद्ध केली कमाल)

बीसीसीआयने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "राष्ट्राचे आणि आमच्या महान खेळामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाचे आरोग्य आणि सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि त्याप्रमाणे, बीसीसीआय आणि फ्रॅंचायझी मालक, प्रसारक, प्रायोजक आणि सर्व भागधारक कबूल करतात की आयपीएल 2020 सीझन फक्त जेव्हा सुरक्षित असेल तेव्हाच सुरू होईल." बीसीसीआय त्याच्या सर्व भागधारकांसह जवळच्या भागीदारीत संभाव्य प्रारंभ तारखेसंदर्भातील परिस्थितीचे परीक्षण आणि भारत सरकार, राज्य सरकार आणि इतर राज्य नियामक संस्थांकडून मार्गदर्शन घेत राहील.

दुसरीकडे, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, सध्याच्या परिस्थितीत कोणताही खेळ शक्य नाही. त्यामुळे, आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याबाबत गांगुलीने याआधी संकेत दिले होते. शिवाय, फ्रँचायसी देखील विदेश खेळाडूंशिवाय टूर्नामेंट खेळण्यासाठी इच्छूक नव्हते. आणि आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 3 मेनंतर यावर निर्णय घेतला जाईल.