बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Photo Credits: IANS)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युएईमध्ये खेळवण्यात येत असलेली इंडियन प्रीमिअर लीग आता अंतिम टप्प्यात आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज आयपीएलमधील शेवटचा साखळी खेळण्यात येणार आहे. त्यानंतर प्ले-ऑफच्या सामन्याला सुरुवात होणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (Australia Tour 2020) रवाना होणार आहे. या दौऱ्यात आयपीएलच्या अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र, भारताचा तडाखेबाज फलंदाज रोहित शर्माला (Rohit Sharma) या दौऱ्यातून वगळल्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे वगळण्यात आलेल्या रोहित शर्मा याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या निवडीबाबत बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांचे मोठे विधान केले आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी अनुभवी आणि युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र, दुखापतीमुळे भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि रोहित शर्माची निवड करण्यात आली नाही. एकीकडे रोहित शर्मा आयपीएलमुळे युएईमध्ये आहे. जरी रोहित शर्मा सराव करताना दिसत असला तरी त्याने गेले 3 सामने खेळले नाहीत. यामुळे आम्ही इशांत आणि रोहित यांच्यावर लक्ष ठेवून आहोत. इंशातला कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तंदुरुस्त व्हावा, असे आम्हाला वाटते. जर, तो फिट असेल तर नक्की त्याच्याबाबत विचार केला जाईल, असे सौरव गांगुली म्हणाले आहेत. हे देखील वाचा-Atya Patya, सुरपाट्या: गावाकडच्या मातीतला चपळाईचा खेळ, गेमींगच्या दुनियेत अनेकांना आठवेल बालपण

या दौऱ्यात भारतीय संघ 3 एकदिवसीय सामने, 3 टी-20 आणि 4 कसोटी सामने खेळणार आहेत. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री युएईमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी निवड समितीचे अध्यक्ष सुनील जोशी यांच्याशी चर्चा करून संघ निवडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी निवडवण्यात आलेल्या संघांमध्ये नवदीप सैनी आणि वरुण चक्रवर्ती यांनाही स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे हे दोन्ही युवा खेळाडू या संधीचे काय करतात? याकडे लक्ष लागले आहे.