भारत U19 क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/BCCI)

ICC Men’s U19 World Cup Announced: आज बीसीसीआयने (BCCI) अंडर-19 तिरंगी मालिका (Under-19 Tri-Series) आणि विश्वचषकासाठी (Under-19 World Cup 2023) संघ जाहीर केला आहे. तिरंगी मालिका दक्षिण आफ्रिकेत (South Africa) खेळवली जाणार आहे. ज्यामध्ये भारत, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचे संघ सहभागी होणार आहेत. तिरंगी मालिका 29 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यानंतर अंडर-19 टीम इंडिया वनडे वर्ल्ड कपच्या तयारीला सुरुवात करेल. बीसीसीआयने 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. (हे देखील वाचा: IND vs SA T20 Head To Head: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील टीम इंडियाचा असा आहे विक्रम, येथे पाहा हेड टू हेड आकडेवारी)

ट्राय सीरीज आणि वर्ल्ड कपसाठी अंडर-19 टीम इंडिया

अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय शरण (कर्णधार), अविनाश राव, सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिबानी, नमन तिवारी.

तिरंगी मालिकेसाठी 3 खेळाडू स्टँडबाय

प्रेम देवकर, अंश गौसाई, मोहम्मद अमान.

बॅकअप प्लेअर

दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी विघ्नेश, किरण चोरमले.

एकदिवसीय विश्वचषकासाठी टीम इंडिया बांगलादेश, आयर्लंड आणि अमेरिका यांच्यासोबत अ गटात आहे. भारतीय संघ 20 जानेवारी 2024 रोजी ब्लोमफॉन्टेन येथे बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर भारत आपले पुढील दोन गट सामने अनुक्रमे 25 आणि 28 जानेवारी रोजी आयर्लंड आणि यूएसए विरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 11 फेब्रुवारी 2024 रोजी बेनोनी येथे खेळवला जाईल.