BCCI Central Contracts List 2020-21: टीम इंडिया खेळाडूंच्या वार्षिक कराराची घोषणा; ‘हे’ खेळाडू होणार करोडपती, पहा संपूर्ण यादी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत टीम इंडियासाठी वार्षिक मानधन करार (Team India Central Contract) जाहीर केले आहेत. बीसीसीआयने (BCCI) नुकत्याच जाहीर केलेल्या यादीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), मर्यादित ओव्हरमध्ये संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा ग्रेड ए+ मध्ये समावेश झाला आहे. म्हणजेच या तीनही खेळाडूंना बीसीसीआयच्या करारानुसार वर्षभरात सर्वाधिक 7 कोटी रुपयांचं मानधन मिळणार. त्यांनतर ग्रेड A मध्ये एकूण 10 खेळाडूंचा समावेश आहे ज्यामध्ये अश्विन, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (Rishabh Pant), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्यासारख्या अनुभवी खेळाडू सामील आहेत. या दहा खेळाडूंना वार्षिक 5 कोटींचे मानधन बीसीसीआय देईल.

दरम्यान, बीसीसीआयच्या केंद्रीय करारानुसार ग्रेड A+ मधील खेळाडूंना वार्षिक 7 कोटी, ग्रेड A खेळाडूंना 5 कोटी तर ग्रेड B खेळाडूंना 3 कोटी आणि ग्रेड C मधील खेळाडूंना वर्षियक 1 कोटी रुपयांचा करार दिला जातो. ग्रेड B मध्ये भुवनेश्वर कुमार, रिद्धिमान साहा, उमेश यादव शार्दूल ठाकूर आणि मयंक अग्रवालचा समावेश केला आहे तर ग्रेड C मध्ये नवदीप सैनी, कुलदीप यादव, शुभमन गिल अक्षर पटेल यांच्यासह एकूण 10 खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे ग्रेड C यादीत कुलदीप यादवचा समावेश आहे तर दुखापतीतून कमबॅक केलेल्या हार्दिकचा Grade A मध्ये पदोन्नती झाली आहे. युजवेंद्र चहलला देखील ग्रेड C मध्ये डेमोट करण्यात आले आहे, तर मनीष पांडेला वार्षिक कराराच्या यादीतून वगळण्यात आले आहेत.

ग्रेडनुसार खेळाडूंची यादी येथे पहा:

ग्रेड A+: विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह

ग्रेड A: रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या.

ग्रेड B: रिद्धिमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर, मयंक अग्रवाल

ग्रेड C: कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चाहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज