Indian Premier League | IPL 2019 | (Photo Credits: Twitter @IPL)

IPL 12 Full Schedule:  आयपीएल सामने (IPL 12) आणि आगामी लोकसभा निवडणूका (lok Sabha Election 2019) यांचे वेळापत्रक यंदा क्लॅश होत असल्याने सुरूवातीला केवळ विशिष्ट टप्प्यातील सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. मात्र आता लोकसभा निवडणूका देशभरात सात टप्प्यांमध्ये होणार असल्याचं जाहीर झाल्यानंतर आता आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये पहिला  सामना (23 मार्च) चैन्नई (CSK) विरूद्ध बंगलोर(RCB) असा होणार असून 5 मे 2019 पर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदा आयपीएल सामन्यांमध्ये ब्रेक न घेता खेळाडूंना सलग सामने खेळावे लागणार आहेत. IPL 2019 Theme Song: Game Banayega Name संकल्पनेवर IPL 12 चं खास थीम सॉंग, महेद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा खास अंदाज (Video)

IPL 2019 वेळापत्रक जाहीर 

IPL 2019  संपूर्ण वेळापत्रक  

  • 23 मार्च : चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू, चेन्नई
  • 24 मार्च : कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता

    मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई

  • 25 मार्च : राजस्थान रॉयल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, जयपूर
  • 26 मार्च : दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली
  • 27 मार्च : कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता
  • 28 मार्च :  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू
  • 29 मार्च : सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स, हैदराबाद
  • 30 मार्च : किंग्स इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स, मोहाली

    दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली

  • 31 मार्च : सनराइझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, हैदराबाद

    चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, चेन्नई

  • 1 एप्रिल : किंग्स इलेव्हन पंजाब वि. दिल्ली कॅपिटल्स, मोहाली
  • 2 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चैलेंजर्स बंगळुरू, जयपूर
  • 3 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई
  • 4 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. सनराइझर्स हैदराबाद, दिल्ली
  • 5 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाईट रायडर्स, बंगळुरू
  • 6 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, चेन्नई

    सनराइझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, हैदराबाद

  • 7 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू

    राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, जयपूर

  • 8 एप्रिल : किंग्स इलेव्हन पंजाब वि. सनराइझर्स हैदराबाद, मोहाली
  • 9 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, चेन्नई
  • 10 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई
  • 11 एप्रिल :  राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, जयपूर
  • 12 एप्रिल :  कोलकाता नाईट राइडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता
  • 13 एप्रिल :  मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई

    किंग्स इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मोहाली

  • 14 एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता

    सनराइझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स, हैदराबाद

  • 15 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई
  • 16 एप्रिल :  किंग्स इलेव्हन पंजाब वि. राजस्थान रॉयल्स, मोहाली
  • 17 एप्रिल :  सनराइझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स, हैदराबाद
  • 18 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली
  • 19 एप्रिल :  कोलकाता नाइट राइडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता
  • 20 एप्रिल :  राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स, जयपूर

    दिल्ली कॅपिटल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, दिल्ली

  • 21 एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट राइडर्स, हैदराबाद

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, बंगळुरू

  • 22 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, जयपूर
  • 23 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. सनराइझर्स हैदराबाद, चेन्नई
  • 24 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. किंग्स इलेव्हन पंजाब, बंगळुरू
  • 25 एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. राजस्थान रॉयल्स, कोलकाता
  • 26 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई
  • 27 एप्रिल :  राजस्थान रॉयल्स वि. सनराइझर्स हैदराबाद, जयपूर
  • 28 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली

    कोलकाता नाईट राइडर्स वि. मुंबई इंडियन्स, कोलकाता

  • 29 एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. किंग्स इलेव्हन पंजाब, हैदराबाद
  • 30 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स, बंगळुरू
  • 1 मे : चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई
  • 2 मे : मुंबई इंडियन्स वि. सनराइझर्स हैदराबाद, मुंबई
  • 3 मे : किंग्स इलेव्हन पंजाब वि. कोलकाता नाईट राइडर्स, मोहाली
  • 4 मे :  दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स, दिल्ली

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनराइझर्स हैदराबाद, बंगळुरू

  • 5 मे : किंग्स इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपर किंग्स    , मोहाली

    मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, मुंबई

आयपीएलच्या सामन्यांनंतर लगेजच खेळाडू यंदाच्या विश्वचषकसाठी सज्ज होणार आहेत.30 मे 2019 पासून वर्ल्ड कपचे सामने रंगणार आहेत. लोढा कमिटीच्या सूचनांनुसार, आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये बोर्डाला किमान 15 दिवसांचा वेळ द्यावा लागतो. भारताचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना 5 जून दिवशी रंगणार आहे. पण संघाची वॉर्म अम मॅच 25, 28 मे दिवशी लॉक करण्यात आली आहे.