Bangladesh National Cricket Team vs South Africa National Cricket Team: बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना 29 ऑक्टोबरपासून खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चट्टोग्रामच्या झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. यासह पाहुण्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आज खेळाचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेश संघाने नऊ षटकांत चार गडी गमावून 38 धावा केल्या होत्या. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात अजूनही 537 धावांनी मागे आहे. (हे देखील वाचा: Bangladesh vs South Africa, 2nd Test Day 3 Preview: बांगलादेशचे फलंदाज लढणार की आफ्रिकन गोलंदाज पुन्हा एकदा करणार कहर, हवामान स्थिती, खेळपट्टीचा अहवाल, मिनी लढाई आणि लाईव्ह स्ट्रिमींगचा सर्व तपशील घ्या जाणून)
बांगलादेशची निराशाजनक सुरुवात
पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या बांगलादेश संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 32 धावा करून संघाचे चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. बांगलादेशकडून महमुदुल हसन जॉयने सर्वाधिक 10 धावा केल्या. मोमिनुल हक सहा नाबाद धावांसह खेळत असून कर्णधार नझमुल हुसेन शांतो चार नाबाद धावांसह खेळत आहे.
किती वाजता सुरु होणार सामना?
बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळाला आज, गुरुवारी, 31 ऑक्टोबर रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजल्यापासून चट्टोग्राम येथील जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला जाईल.
कुठे पाहणार सामना
FanCode कडे बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका 2024 भारतात प्रसारित करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी 2024 चे प्रसारण भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनलवर उपलब्ध होणार नाही. तर बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी 2024 चे लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात उपलब्ध असेल.