Andrew Symonds Death: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू, क्रिकेट विश्वात शोककळा
Andrew Symonds (Photo Credit - Twitter)

ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा (Andrew Symonds) कार अपघातात मृत्यु झाला आहे. रात्री टाऊन्सविले येथे झालेल्या कार अपघातात सायमंडचा मृत्यू झाला. या दु:खद बातमीने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अँड्र्यू सायमंड्सची कार शनिवारी रात्री अपघाताची शिकार झाली. स्थानिक माध्यमांनुसार सायमंडला वाचवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. अपघातादरम्यान अँड्र्यू सायमंड्सला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अँड्र्यू सायमंड्सच्या निधनाने त्याच्या चाहत्यांवरही शोककळा पसरली आहे. क्वीन्सलँड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास हर्वे रेंज येथे ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

वेग जास्त असल्याने कार रस्त्यावर पलटी झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यात सायंड्स होते. एलिस नदीवरील पुलाजवळ हा अपघात झाला. सायमंड्स यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र यश आले नाही.

1998 मध्ये केले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

सायमंड्सने 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याची पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड झाली. सायमंड्सने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिला सामना 10 नोव्हेंबर 1998 रोजी खेळला. त्याने मार्च 2004 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याच वेळी, सायमंड्सने फेब्रुवारी 2005 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

त्याच्या 11 वर्षांच्या (1998-2009) प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत, सायमंड्सला असे अनेक प्रसंग आले जेव्हा त्याने ऑस्ट्रेलियासाठी स्वबळावर सामने जिंकले. आक्रमक फलंदाज असण्यासोबतच तो एक चतुर गोलंदाजही होता. ते मर्यादित षटकांच्या क्रिकेटचे संपूर्ण पॅकेज होता. 2003 आणि 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सायमंड्सने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ऑस्ट्रेलियासाठी एकूण 26 कसोटी, 198 एकदिवसीय आणि 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने कसोटीत 40.61 च्या सरासरीने 1462 धावा, एकदिवसीय सामन्यात 39.44 च्या सरासरीने 5088 धावा आणि T20 मध्ये 48.14 च्या सरासरीने 337 धावा केल्या आहेत. याशिवाय सायमंड्सने कसोटीत 24, एकदिवसीय सामन्यात 133 आणि टी-20मध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत. (हे देखील वाचा: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड झाले मालामाल; PSL च्या 7 व्या हंगामाने करून दिली अब्ज पाकिस्तानी रुपयांची कमाई, आकडा पाहून व्हाल थक्क)

सायमंड्सने 39 आयपीएल सामन्यांमध्येही भाग घेतला. यामध्ये त्याच्या नावावर 36.07 च्या सरासरीने आणि 129.87 च्या स्ट्राईक रेटने 974 धावा आहेत. याशिवाय सायमंड्सने लीगमध्ये 20 विकेट्सही घेतल्या. सायमंड्स आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्सकडून खेळला होता.