Australia Women National Cricket Team vs Sri Lanka Women National Cricket Team, ICC Womens T20 World Cup 2024 5th Match: 2024 ICC महिला T20 विश्वचषक सुरु झाला आहे. T20 विश्वचषकाचा पाचवा सामना ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात आहे. उभय संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाची कमान ॲलिसा हिलीच्या हाती आहे. तर श्रीलंकेचे नेतृत्व चमारी अथापथुकडे आहे. दोन्ही संघांमध्ये आज रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. आता ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघ यांच्यात एकूण 7 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत ऑस्ट्रेलियन संघाने सर्व सामने जिंकले आहेत. या ट्वेंटी-20 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात श्रीलंकेची कर्णधार चमारी अथापथूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - ENG W vs BAN W, 2024 ICC Women's T20 World Cup Head to Head: महिला T20 विश्वचषकातील बांगलादेश विरुद्ध इंग्लंड सामन्यापूर्वी पहा हेड टू हेड रेकॉर्ड )
पाहा पोस्ट -
🇦🇺 Australia vs Sri Lanka 🇱🇰 - Match 5
SL: Inoka Ranaweera replaces Sachini Nisansala
AUS: Phoebe Litchfield returns from injury
TOSS: SL, BAT#T20WorldCup | #AUSvSL pic.twitter.com/vB1pdzGcvz
— Women’s CricZone (@WomensCricZone) October 5, 2024
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग XI
ऑस्ट्रेलिया: ॲलिसा हिली (कर्णधार आणि विकेटकीपर), बेथ मूनी, एलिस पेरी, ॲशले गार्डनर, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, ॲनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरेहम, सोफी मॉलिनक्स, मेगन शट, डार्सी ब्राउन.
श्रीलंका: विशामी गुणरत्ने, चमारी अथापथु (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, हसिनी परेरा, कविशा दिलहरी, नीलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), सचिनी निसानसाला, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शिनी, इनोका रणवेरा.