श्रीलंका फलंदाज करुणारत्ने (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Australia vs Sri Lanka: ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका आजच्या (2 फेब्रुवारी) दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान श्रीलंकेचा फलंदाज करुणारत्ने (Karunaratne) याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच मानेवर चेंडू आदळल्याने त्याला स्ट्रेचरवरुन मैदावरुन तातडीने बाहेर उपचारासाठी बाहेर आणण्यात आले आहे.

सामना खेळताना करुणारत्ने याच्या मानेला चेंडू जोरदार आदळल्याने तो जागच्या जागी खाली कोसळला. त्यामुळे तातडीने वैद्यकिय अधिकारी मैदानात धावत येऊन त्यांनी त्याला स्ट्रेचरवर प्रथम ठेवले. तर करुणारत्ने याला झालेली दुखापत ही गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंच्या काळजाचा ठोका चुकला आहे. तर अद्याप करुणारत्ने याच्या प्रकृती बाबत कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 534 धावा काढत श्रीलंका संघातील सलामीवीर दिमुथ करुणारत्ने आणि लाहिरु थिरीमाने यांची संघाकडून उत्तम सुरुवात झाली. मात्र आजच्या सामन्या दरम्यान घडलेल्या घटनेमुळे सर्व खेळाडूंमध्ये करुणारत्नेच्या प्रकृतीबद्दल नाराजगी व्यक्त होत आहे.