ऑस्ट्रेलिया (Australia)-बांगलादेश (Bngladesh) विश्वकप सामना चांगलाच रंगला. बांगलादेशच्या संघाने शेवटपर्यंत झुंज दिली पण सामना वाचवण्यात त्यांना काही यश आले नाही. बांगलादेशचा सलामीवीर सौम्या सरकार (Soumya Sarkar) लवकर बाद झाला मात्र त्याने आपल्या गोलंदाजीने निराश केले नाही. सौम्यने ऑस्ट्रेलियाच्या तीन मुख्य अॅरॉन फिंच (Aaron Finch), डेविड वॉर्नर (David Warner) आणि उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) यांना बाद केले. सौम्यने 21 व्या ओव्हरमध्ये फिंचची विकेट घेतली आणि क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) च्या शैलीत त्याने त्याचा आनंद साजरा केला. या प्रसंगाबद्दल ट्विटरवर सांगता आयसीसी (ICC) ने रोनाल्डोबरोबर सरकारची तुलना केली आणि त्यांच्या चित्रांचे एक कोलाज पोस्ट केले. त्यावर आयसीसी ने लिहिले "जन्मावेळी वेगळे केले? # सीडब्ल्यूसी19 | # राइजऑफदटाइगर्स | #आशुवन " (ICC World Cup 2019: 26 मॅच नंतर कोण आहे टॉप-5 फलंदाज, गोलंदाज; पॉइंट्स टेबल, जाणून घ्या)
पण, नेटकऱ्यांना हे काही आवडले नाही आणि त्यांनी आयसीसीला चांगलेच धारेवर धरलं. ICC ला सध्या सोशल मीडियावर मिम्स द्वारे चांगलाच ट्रोल केले जात आहे.
— Gappistan Radio (@GappistanRadio) June 20, 2019
— हेमन्त (@_HemantMishra) June 20, 2019
Me to admin:- pic.twitter.com/aDeAeFLNvv
— Saurabh Manjhi 🇮🇳 (@saurabhmanjhi_) June 20, 2019
Ronaldo Be Like W T F 😷😭 pic.twitter.com/UcdWBsgLEh
— Dr Khushboo 🤭 (@khushikadri) June 20, 2019
— Pun of God (@Punofgod) June 20, 2019
Cr7 to Admin: pic.twitter.com/jRa1AiAPi0
— Afrid Appu (@AfridAppu7) June 20, 2019
— Queen Of Bundelkhand ❣️ (@akkik8) June 20, 2019
बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नरच्या दीडशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया ने 50 षटकांत 5 बाद 381 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशनं शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली. मात्र, त्यांना 8 बाद 333 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंचने पहिल्या विकेटसाठी 212 धावांची भागिदारी केली. वॉर्नरने यंदाच्या वर्ल्ड कपमधील दुसऱं शतक साजरं केलं. वॉर्नरने 110 चेंडूत शतक ठोकळ. वॉर्नर ने 147 चेंडूत 166 धावा केल्या.