Photo Credit- X

Australia Women's National Cricket vs England Women's National Cricket Team 2nd ODI 2025 Scorecard: महिला अ‍ॅशेस 2025 मधील ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 14 जानेवारी रोजी मेलबर्नमधील जंक्शन ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 44.3 षटकांत 180 धावांवर आटोपला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी अपयशी ठरली. ऑस्ट्रेलियाकडून एलिस पेरीने सर्वाधिक धावा केल्या. एलिस पेरीने 74 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 60 धावा केल्या. याशिवाय सलामीवीर फोबी लिचफिल्डने 29 धावांचे योगदान दिले. (ICC Champions Trophy 2025 All Squads: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आतापर्यंत 'या' देशांनी जाहीर केले संघ, एका क्लिकवर पाहा खेळाडूंची संपूर्ण यादी)

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. फोबी लिचफिल्ड आणि एलिसा हिली यांनी पहिल्या विकेटसाठी 8 षटकांत 43धावा जोडल्या. तथापि, ९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर लॉरेन बेलने हीलीची विकेट घेतली. त्यानंतर 92 धावांवर विकेट पडली. त्यानंतर यजमान संघाला पुनरागमन करणे कठीण झाले. 132 धावांवर तिसरी विकेट गमावल्यानंतर, लागोपाठ विकेट पडू लागल्या आणि संघ 180 धावांवर सर्वबाद झाला. बेथ मूनी फक्त 12 धावा करू शकली आणि अ‍ॅनाबेल सदरलँड फक्त 11धावा करू शकली.

इंग्लंडची गोलंदाजी चांगली होती. इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोनने 10 षटकांत 35 धावा देत 2 मेडन्ससह 4 विकेट्स घेतल्या. एक्लेस्टोन व्यतिरिक्त, अॅलिस कॅप्सीनेही 3 विकेट्स घेतल्या. तर लॉरेन बेलने 2 आणि लॉरेन फाइलरने 1 विकेट घेतली.

दोन्ही संघांचे खेळाडू

ऑस्ट्रेलिया महिला संघ: फोबी लिचफिल्ड, अ‍ॅलिसा हीली (कर्णधार आणि विकेटकीपर), एलिस पेरी, बेथ मूनी, अ‍ॅनाबेल सदरलँड, अ‍ॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शट, डार्सी ब्राउन खेळत आहे

इंग्लंड महिला संघ: टॅमी ब्यूमोंट, माया बाउचियर, हीदर नाइट (कर्णधार), नॅट सायव्हर-ब्रंट, डॅनिएल वायट-हॉज, एमी जोन्स (विकेटकीपर), अ‍ॅलिस कॅप्सी, शार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फाइलर, लॉरेन बेल