Australia Women National Cricket Team vs Pakistan Women National Cricket Team 14th Match 2024 ICC Womens T20 World Cup Live Streaming: 2024 ICC महिला T20 विश्वचषकाचा 14 वा सामना आज 11 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ (Australia Women National Cricket Team) विरुद्ध पाकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ ( Pakistan Women National Cricket Team) यांच्यात होणार आहे. संघांमधील हा सामना दुबईमधील दुबई क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाने विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली. सध्या ऑस्ट्रेलिया मागील दोन सामन्यात प्राप्त केलेल्या विजयामुळे गुणतालिकेत प्रथम स्थानी आहे तर पाकिस्तान संघ हा सध्या 1 विजयासह सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. या सामन्यात विजयासह ऑस्ट्रेलिया आपला सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करेल. दुसरीकडे, या स्पर्धेत आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी पाकिस्तान संघ हा या सामन्यात विजयासाठी प्रयत्न करेल. (हेही वाचा - West Indies Women Beat Bangladesh Women 13th Match Scorecard: वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 8 गडी राखून केला पराभव, हेली मॅथ्यूज आणि स्टॅफनी टेलर यांची झंझावाती खेळी)
यांच्यातील 2024 ICC महिला T20 विश्वचषकातील 14 वा सामना कधी खेळला जाईल?
2024 ICC महिला T20 विश्वचषकातील 10 वा सामना ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध पाकिस्तान महिला यांच्यात गुरुवार, 11 ऑक्टोबर रोजी दुबई क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे IST संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाईल.
थेट सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा
भारतात 2024 च्या ICC महिला T20 विश्वचषकातील सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केले जातील. अशा परिस्थितीत चाहत्यांना ऑस्ट्रेलिया महिला पाकिस्तान महिला यांच्यातील सामन्याचा टीव्हीवर आनंद घेता येईल. याशिवाय, डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह-स्ट्रीम केले जाईल.
पाहा दोन्ही संभाव्य संघ
ऑस्ट्रेलिया संघ: बेथ मूनी, ॲलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), जॉर्जिया वेअरहॅम, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शट, डार्सी ब्राउन, ग्रेस हॅरिस, किम गर्थ, अलाना किंग, टायला व्लामिंक
पाकिस्तान संघ: मुनिबा अली (विकेटकीपर), गुल फिरोजा, सिद्रा अमीन, निदा दार, आलिया रियाझ, फातिमा सना (कर्णधार), तुबा हसन, नशरा संधू, डायना बेग, सादिया इक्बाल, ओमिमा सोहेल.