एशिया कप 2018 : सामना भारताने पण चाहत्यांची मनं 'या' पाकिस्तानी तरूणीने जिंकली !
एशिया कप 2018 भारत विरूद्ध पकिस्तान

दुबई : क्रिकेट हा धर्माप्रमाणे मानल्या जाणार्‍या भारतामध्ये गल्लोगल्ली क्रिकेट चाहते आहेत. यामध्येही भारत विरूद्ध पाकिस्तान क्रिकेट सामने उत्कंठावर्धकच असतात. काल एशिया कपमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तानचा सामना रंगला. भारताने पाकिस्तानवर मात केली. मात्र भारतीय तरूणांच्या मनावर मात्र एक पाकिस्तानी तरूणी राज्य करून गेली आहे.

सोशल मीडीयातही पाकिस्तानी फॅन तरूणीची चर्चा

दुबईच्या मैदानावर भारत विरूद्ध पाकिस्तानचा सामना रंगला. मात्र सामन्याइतकीच एक पाकिस्तानी फॅन तरूणी चाह्त्यांचं लक्ष वेधून गेली. तिच्या अदांनी घायाळ झालेल्या अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका चाह्त्याने चक्क या तरूणीला पुन्हा पुन्हा पाहायला मिळेल या आशेसाठी भारत विरूद्ध पाक सामने वाढवा अशी बीसीसीआयकडे मागणी केली आहे.

 

भारत विरूद्ध पाक सामना

भारताने टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा गोलंदजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 43.1 ओव्हरमध्येच 162 धावांवर पाकचा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. या टुर्नामेंटमधील भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. तर पाकिस्तानची ही पहिली हार आहे. यापूर्वी पाकने हॉंगकॉंगवर आठ विकेट्सनी विजय मिळवला होता.