ओल्ड ट्रॅफर्ड, मॅनचेस्टर (Manchester) येथे झालेल्या चौथ्या अॅशेस (Ashes) सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर पूर्णपणे वर्चस्व राखले. स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने आणखी एक शानदार खेळी साकारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला विजयासाठी एक दिवस राखत 383 धावांचे लक्ष्य ठेवले. आज, पाचव्या आणि शेवटच्या दिवशी मालिकेमध्ये 2-1 अशी आघाडी मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला अजून 4 विकेट्सची गरज आहे. ऑस्ट्रेलियाचे पहिल्या चारही सामन्यात वर्चस्व राखले असूनही इंग्लंडकडून दुसर्या डावात त्यांचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer), हा एकमेव असा गोलंदाज होता ज्याला आपली छाप सोडण्यात यश मिळाले. मागील सामन्यांप्रमाणेच आर्चरच्या चेंडूने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनाही बरीच समस्या निर्माण केली आणि दुसर्या डावात 45 धावा देऊन 3 बळी टिपले. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 6 बाद 186 धावांवर घोषित केला. (Ashes 2019: स्टीव्ह स्मिथ याला हूट करणाऱ्या इंग्लंड चाहत्यांची ICC ने उडवली खिल्ली, 'कर्मा' म्हणत केले 'हे' मजेदार Tweet)
याचदरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाज मॅथ्यू वेड (Matthew Wade) विरुद्ध धाडसी कार्याने 24 वर्षीय आर्चरने ओल्ड ट्रॅफर्डमध्येही प्रेक्षकांचे मनोरंजन केले. वेडने शॉट खेळला आणि आर्चरच्या चेंडूवर एकच धावा केली. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना आर्चर त्याच्यासमोर उभा राहिला आणि त्याचा मार्ग अडवून वेडला भयंकर लुक दिला. यामुळे वेडला माघार घेण्यास भाग पाडले आणि त्याने एकच धाव काढली. पहा हा व्हिडिओ इथे:
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 383 धावांचा पाठलाग करत असलेल्या इंग्लंडची स्थिती 6 बाद 160 धावा अशी झाली आहे. चौथी टेस्ट जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला अजून 4 विकेट्सची गरज आहे. तर इंग्लंडच्या अन्य फलंदाजांना, हा सामना ड्रॉ करण्यासाठी अजून काही तास टिकून खेळण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलियासाठी माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी बजावली. स्मिथने पहिल्या डावात 211 तर दुसऱ्या डावात 92 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाला इंग्लंडपुढे मोठे आव्हान देणे शक्य झाले. सध्या, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांच्या टेस्ट मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहे. आजचा सामना जिंकत ऑस्ट्रेलिया 2-1 ने आघाडी मिळवत मालिके खिशात घालण्याच्या निर्धारित असेल.