
Delhi Capitals vs Mumbai Indians, TATA IPL 2025 63rd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 63 वा सामना आज म्हणजेच 21 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. या हंगामात मुंबईची धुरा हार्दिक पंड्याच्या खांद्यावर आहे. तर, दिल्लीचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, परंतु दिल्लीसाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. जर दिल्ली कॅपिटल्स आज मुंबईला हरवू शकले नाही, तर या हंगामातील त्यांचा प्रवास इथेच संपेल आणि मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये त्यांचे स्थान निश्चित करेल.
हेड टू हेड रेकॉर्ड (MI vs DC Head to Head Record)
आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये एकूण 36 सामने खेळले गेले आहेत. या काळात, मुंबई इंडियन्सने वरचढ कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्स संघाने 20 सामने जिंकले आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्सने 16 सामने जिंकले आहेत. या हंगामात दोन्ही संघांमधील ही दुसरी भेट आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 12 धावांनी विजय मिळवला होता. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळले गेले होते. या काळात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला होता.
हा संघ जिंकू शकतो (MI vs DC Match Winner Prediction)
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी हा सामना आव्हानात्मक असू शकतो, विशेषतः मुंबई इंडियन्सच्या मजबूत गोलंदाजी आणि फलंदाजीविरुद्ध. मुंबई इंडियन्सच्या अलीकडील कामगिरीकडे पाहता, ते स्पर्धेतील ६३ वा टी-२० सामना जिंकू शकतात. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळतो.
मुंबई इंडियन्स जिंकण्याची शक्यता: 65%
दिल्ली कॅपिटल्सच्या जिंकण्याची शक्यता: 45%.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
मुंबई इंडियन्स: रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.
दिल्ली कॅपिटल्स: फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), समीर रिझवी, केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, कुलदीप यादव, टी नटराजन आणि मुस्तफिजुर रहमान.