भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज अंबाती रायडूवर (Ambati Rayudu) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (International Cricket Council) बंदी घातली आहे.
13 जानेवारी रोजी सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अंबातीच्या गोलंदाजी शैलीवर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर नियमाप्रमाणे त्याने 14 दिवसांमध्ये आयसीसीसमोर गोलंदाजी चाचणी देणे गरजेचे होते. मात्र त्याने ही चाचणी न दिल्याने आयसीसीने त्याच्यावर बंदी घातली आहे. (हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांना दिलासा; BCCI ने रद्द केले निलंबन)
JUST IN: Ambati Rayudu has been suspended from bowling in international cricket.
Details https://t.co/n400JyZJdf pic.twitter.com/0QUfFfmnUs
— ICC (@ICC) January 28, 2019
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या नियमानुसार (Board of Control for Cricket in India) रायडूला देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्याची परवानगी देण्यात येऊ शकते.
भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत पहिल्या एकदिवसीय सामन्यात 34 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यात अंबाती रायडूने गोलंदाजी करताना 2 ओव्हरमध्ये 13 रन्स दिले होते. त्यामुळे त्याच्या गोलंदाजी शैलीवर आपेक्ष घेण्यात आला असून ICC ने त्याच्यावर बंदी घातली आहे.