Ajinkya Rahane (Photo Credit - Twitter)

भारतीय संघाबाहेर असलेला माजी कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) आगामी वन डे कप स्पर्धेत लिसेस्टरशायर कौंटी क्रिकेट क्लबकडून खेळणार आहे. गेल्या 1 वर्षापासून त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळालेली नाही. गेल्या वर्षी वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याला भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले होते. मात्र, रहाणेसाठी हा दौरा फारसा चांगला ठरला नाही आणि त्याला दोन्ही डावांत एकही अर्धशतक झळकावता आले नाही. या दौऱ्यापासून त्याला टीम इंडियात स्थान मिळालेले नाही. दरम्यान, अजिंक्य रहाणेने Leicestershire खेळण्याचा निर्णय हा घेतला.

“लिसेस्टरशायरला येण्याची आणखी एक संधी मिळाल्याने मी खरोखरच उत्साहित आहे. क्लॉड हेंडरसन आणि अल्फोन्सो थॉमस यांच्याशी माझी चांगली बाँडिंग झाली आहे. मी समर सिझनमध्ये क्लबसाठी खेळण्यास उत्सुक आहे. या संघाची मागील वर्षातील कामगिरी पाहिली आणि मी खूप प्रभावित झालो आहे. मी क्रिकेटचा आनंद लुटू शकेन आणि या हंगामात क्लबसाठी अधिक यश मिळवू शकेन, अशी मला आशा आहे, ” असे अजिंक्य रहाणे यांनी म्हटले आहे.

पाहा पोस्ट -

अजिंक्य रहाणेने 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याला भारताकडून आतापर्यंत 195 सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने 8 हजारहून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 38.46 च्या सरासरीने 5077 धावा आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 35.26 च्या सरासरीने 2,962६२ धावांचा समावेश आहे.