ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) टीम इंडियाला (Team India) ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेचं (Ajinkya Rahane) मुंबईतील निवासस्थानी जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी अजिंक्यसह पत्नी राधिका आणि चिमुरडी आर्याही उपस्थित होती. विराट कोहली पितृत्व रजेसाठी मायदेशी परतल्यावर रहाणेला नेतृत्वातची जबाबदारी देण्यात आली आणि मुंबईकर (Mumbai) फलंदाजानेही निराश केले नाही व चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत पुढाकार घेत नेतृत्व करत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. अॅडिलेडमध्ये भारताला अपमानास्पद पराभवाला सामोरे जावे लागले आणि नियमित कर्णधार कोहलीने पितृत्व रजावर गेल्याने सर्वांचे लक्ष रहाणेवर होते. मेलबर्न येथे पहिल्या डावात शतक झळकावत 32 वर्षीय रहाणेने चमकदार कामगिरी केली आणि दुसऱ्या डावात नाबाद धावा करत संघाला 8 विकेट ने विजय मिळवून देण्यात महत्वाचा वाटा उचलला. मुंबईतील आपल्या राहत्या घरी परतल्यावर रहाणेचे ढोल-ताशाच्या गजरात रहिवाश्यांनी स्वागत केले व क्रिकेटपटूवर फुलांचा वर्षाव केला. (ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजयानंतर Team India मायदेशी परतली; अजिंक्य रहाणे, रवि शास्त्री, पृथ्वी शॉ यांचं मुंबई एअरपोर्टवर जंगी स्वागत, पहा Photos)
भारतीय क्रिकेट संघाचे पाच सदस्य गुरुवारी सकाळी ऑस्ट्रेलिया दौर्यावरुन मुंबईला परतले आणि त्यांना सात दिवसांच्या होम-क्वारंटाइन रहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पीटीआयला सांगितले की, क्रिकेट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागेल. चहल म्हणाले, "खेळाडूंना पुढील सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये रहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे." रहाणेसह रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर आणि पृथ्वी शॉ आणि मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री गुरुवार सकाळी मुंबईत दाखल झाले.
अॅडिलेड येथील पहिल्या पिंक-बॉल टेस्ट सामन्यात आपल्या कसोटी इतिहासातील सर्वात नीचांकी 36 धावांख्या नोंदवली. यांनतर टीम इंडियाचा कसोटी मालिकेत 4-0 ने पराभव होईल, अशी भविष्यवाणी अनेक दिग्गजांनी केली होती मात्र, रहाणेच्या टीम इंडियाने कांगारुंचा त्यांच्याच भूमित 2-1 ने पराभव करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, मुंबईत दाखल झालेल्या खेळाडूंसाठी खुशखबर म्हणजे या सवर्णन क्वारंटाईनच्या नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियावरून निघालेले भारतीय खेळाडू दुबईमार्गे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत.