IND vs ZIM (Photo Credit - X)

IND vs ZIM T20 Series 2024: भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात पाच टी-20 सामन्यांची मालिका (T20I Series) खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना शनिवारी होणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे (Shubman Gill) आहे, तर झिम्बाब्वे संघाचे नेतृत्व सिकंदर रझाकडे आहे. टी-20 विश्व क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. वास्तविक, भारतीय संघ नंबर-1 बनल्यानंतर प्रथमच झिम्बाब्वेविरुद्ध खेळत आहे. त्याच वेळी, आकडेवारी दर्शवते की या फॉरमॅटमध्ये झिम्बाब्वेने भारतीय संघाला कडवी टक्कर दिली आहे. झिम्बाब्वेने गेल्या 5 टी-20 सामन्यांमध्ये भारताला कडवी टक्कर दिली आहे. झिम्बाब्वेने भारताला दोनदा पराभूत केले आहे, तर भारतीय संघाने तीन वेळा विजय मिळवला आहे. त्याचवेळी, आत्तापर्यंत भारत आणि झिम्बाब्वे आठ वेळा टी-20 फॉरमॅटमध्ये आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने 6 वेळा विजय मिळवला आहे. तर झिम्बाब्वेने भारताला दोनदा पराभूत केले आहे.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 फॉरमॅटमध्ये सामना...

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात हरारे येथे एकूण 8 टी-20 सामने झाले आहेत. 2010 मध्ये या मैदानावर भारत पहिल्यांदा टी-20 खेळला होता. हरारे स्पोर्ट्स क्लब सॅलिसबरी स्पोर्ट्स क्लब म्हणून ओळखला जातो. या मैदानावर आतापर्यंत 41 टी-20 सामने खेळले गेले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 23 वेळा विजय मिळवला आहे, तर 17 वेळा संघांनी धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना सरासरी धावसंख्या 156 धावांची आहे. तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या 139 धावांची आहे.

हरारेमध्ये  कसे असेल हवामान?

भारत-झिम्बाब्वे सामन्यादरम्यान हरारेमध्ये तापमान 11 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वे उत्तर गोलार्धात वसलेले असल्याने जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये थंड हवामान अनुभवते. त्याचवेळी क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की पावसाची शक्यता नाही. (हे देखील वाचा: IND vs ZIM T20 Series 2024: झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेत 'हे' भारतीय गोलंदाज करु शकताता कहर, आकडेवारी देत आहे साक्ष)

भारतीय चाहत्यांना कधी अन् कुठे पाहता येइल सामना?

भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता सामना सुरू होईल. पण भारतीय चाहत्यांना लाईव्ह स्ट्रीमिंग आणि ब्रॉडकास्ट कसे पाहता येईल? भारतीय चाहत्यांना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत-झिम्बाब्वे टी-20 मालिका पाहता येणार आहे. याशिवाय, तुम्ही सोनी लाइव्ह ॲपवर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल.