एबी डिव्हिलियर्स (Photo Credit: Twitter/IPL)

दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) दिग्गज एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता डिव्हिलियर्स आयपीएल (IPL) मधेही झळकणार नाही. आपल्या वेगवान फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकणाऱ्या ‘मिस्टर 360’ म्हणजेच डिव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, तो जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळत होता. आयपीएलमध्ये तो विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) भाग होता. ट्विटरवर डिव्हिलियर्सने लिहिले की, 37 व्या वर्षी त्याच्यासाठी ज्योत आता तितक्या तेजस्वीपणे जळत नाही. डिव्हिलियर्स हा आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) फ्रँचायझीच्या मधल्या फळीतील अनेक वर्षांपासून महत्त्वाचा सदस्य होता आणि अनेकदा संघाचा मॅच-विनर ठरला होता. ('मिस्टर 360’ एबी डिविलियर्स सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त)

डिव्हिलियर्स सारख्या प्रतिभावान खेळाडूला रिप्लेस करणे अशक्य असले तरी खालील 3 खेळाडू लिलावात आरसीबी (RCB) संघात उणीव भरून काढू शकतात.

1. सूर्यकुमार यादव

आरसीबी फलंदाजी विभागात डिव्हिलियर्सची भूमिका घेण्यासाठी सूर्यकुमार सर्वात योग्य पर्याय आहे. त्याला अलीकडच्या वर्षांत मुंबई इंडियन्स (MI) साठी सामने जिंकण्याचा पुरेसा अनुभव आहे आणि त्याने भारतासाठी देखील खेळण्यास करण्यास सुरुवात केली आहे. सूर्यकुमारचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो संघाच्या मागणीनुसार कुठेही फलंदाजी करू शकतो. डिव्हिलियर्स हा त्यातला तज्ज्ञ होता. तो मधल्या षटकांमध्ये येऊन गडबडणारा डाव सावरू शकत किंवा डेथ ओव्हरच्या वेळ फटकेबाजी करण्यातही सक्षम होता. यंदाच्या लिलावासाठी सूर्यकुमारला रिलीज केले असल्यास RCB साठी मोठी संधी मिळू शकते.

2. शिमरॉन हेटमायर

डिव्हिलियर्ससाठी शिमरॉन हेटमायरची बदली सारखी वाटत नाही. आणि ते कधीच असू शकत नाही. तथापि वेस्ट इंडियन असा खेळाडू आहे ज्याला या भूमिकेसाठी तयार केले जाऊ शकते. आतापर्यंतच्या त्याच्या छोट्या कारकिर्दीत, हेटमायरने वेस्ट इंडिज क्रिकेटमधील उदयोन्मुख खेळाडू म्हणून ओळखले जाण्याची पुरेशी क्षमता दाखवली आहे. जवळपास अशक्य अशा परिस्थितीतून संघासाठी सामना जिंकण्यासाठी हेटमायरकडे सर्व मोठे स्ट्रोक आहेत, ज्याचा डिव्हिलियर्सला अभिमान होता.

3. एडन मार्करम

आफ्रिकन फलंदाजांच्या सध्याच्या खेळाडूंमध्ये एडन मार्करम आक्रमक आणि सातत्यपूर्ण दिसत आहे. त्याचा कॉम्पॅक्ट स्ट्रोक खेळ आणि दबावाखाली शांतता यामुळे अनेक समीक्षक प्रभावित झाले आहेत. 27 वर्षीय खेळाडूने आयपीएल 2021 हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीत पंजाब किंग्जकडून पदार्पण केले आणि सहा सामन्यांमध्ये 146 धावा केल्या. मार्करमच्या फलंदाजीची गुणवत्ता टी-20 विश्वचषक 2021 दरम्यान प्रदर्शित झाली जेव्हा त्याने 40, 51* आणि 52* धावा केल्या. त्याने आपल्या देशाचे आणि त्याच्या आयपीएल फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व करताना डीव्हिलियर्सने ज्या प्रकारची खेळी केली त्याच प्रकारचा खेळ खेळला.