लहान मुलाच्या स्फोटक फलंदाजीचा व्हिडिओ व्हायरल (Photo Credit: Instagram/cricketaakash)

Kid Hitting Powerful Shots: माजी क्रिकेटपटू आकाश चोपडा (Aakash Chopra) यांनी एका लहान मुलाचा अभूतपूर्व क्रिकेट शॉट्स खेळत असल्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडिओ,मध्ये लहान मुलगा लांबच-लांब फटके मारताना दिसत आहे जे पाहून या माजी क्रिकेटपटू-भाष्यकार देखील आश्चर्यचकित झाले. मुलाच्या प्रतिभेचे कौतुक करीत माजी भारतीय सलामी फलंदाजाने लिहिले: "हे लहान मूल किती चांगले आहे!!!" व्हिडिओमध्ये डाव्या हाताने मुलगा पायर्‍यावर उभा आहे आणि चेंडूच्या प्रतीक्षेत आहे. मोकळेपणाने उभे राहून, मुलगा हात मुक्त करण्यास तयार आहे. आणि बॉल येताच, मुलाने त्याच्यावर काहीच दया दाखवित नाही आणि मोठा शॉट मारला. व्हिडिओ पाहून यूजर्स देखील प्रभावित झाले ज्यांनी त्याला 'मिनी रिषभ पंत' (Rishabh Pant) असे म्हटले. मुलाच्या उत्कृष्ट बॅट स्विंगचे कौतुक करीत असताना चाहत्यांमध्ये हा व्हिडिओ त्वरित हिट ठरला. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलाने अगदी कमी वयात जबरदस्त फलंदाजी करून सर्वांना नक्कीच चकित केले. (IPL 2020 Update: UAE मध्ये आयपीएल झाल्यास विराट कोहलीच्या RCBच्या जिंकण्याची शक्यता वाढवू शकेल, आकाश चोपडा यांनी सांगितले 'हे' कारण)

सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असलेल्या आकाश चोपडा यांनी यापूर्वीही लहान मुलांनी सुंदर क्रिकेट शॉट्स खेळतानाचे व्हिडिओ शेअर केले आहेत. रॉ व्हिडिओ शेअर करण्याऐवजी दिल्लीचा माजी खेळाडू अशा क्लिपमध्ये शेअर करतो ज्यामध्ये प्रेक्षकांची अधिक रुची असते. आकाश यांनी मागील महिन्यात असाच एक व्हिडिओ ज्यात एक लहान मुलगी भारताचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार एमएस धोनीचा प्रसिद्ध हेलिकॉप्टर खेळताना दिसली आणि त्यांनी सीएसके कर्णधाराशी तिची तुलना केली. पाहा लहान मुलाच्या फलंदाजीचा हा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

How good is this young kid!!! #talented #aakashvani #feelitreelit #feelkaro

A post shared by Aakash Chopra (@cricketaakash) on

व्हिडिओ पाहून उत्साही यूजर्सने त्याला टीम इंडियाचा युवा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतशी जोडले.

(Photo Credit: Instagram)
(Photo Credit: Instagram)

दुसरीकडे, आयपीएल  2020 मध्ये माजी क्रिकेटपटू आणि भाष्यकार आकाश चोपडा कमेंट्री करताना दिसतील. आयपीएलचे 13 वे सत्र 19 सप्टेंबरपासून सुरू होईल तर अंतिम सामना 10 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. आयपीएल 2020 चा पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल.