गौतम गंभीर (Gautam Gambhir) पुन्हा एकदा आयपीएलमध्ये (IPL) दिसणार आहे. मात्र यावेळी त्यांची भूमिका बदललेली असणार आहे. आयपीएलच्या 15 (IPL 2022) व्या हंगामात 8 च्या जागी 10 संघ खेळताना दिसणार आहेत. आयपीएलमध्ये लखनौ (Lucknow Team) आणि अहमदाबाद (Ahmedabad Team) या दोन संघाची एन्ट्री झाली आहे. गौतम गंभीर लखनौ संघामध्ये (Lucknow Team) जाईन झाला आहे. गंभीर आता मेटॅार म्हणुन संघासोबत जोडला गेला आहे. या फ्रँचायझीची मालकी RPSG ग्रुपकडे आहे. लखनौचा संघ 7 हजार 90 कोटी रुपयांना विकत घेण्यात आला आहे. गौतम गंभीरला या संघाचा मार्गदर्शक बनवण्यात आल्याने खूप आनंद झाला आहे.
गौतम गंभीरने लखनौ संघाचा मेटॅार झाल्याबद्दल ट्विट केले की, “पुन्हा स्पर्धेत सहभागी होणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी डॉ. गोयंका यांना लखनौ आयपीएल संघाचे मार्गदर्शक म्हणून सामील केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. विजयाची आग अजूनही माझ्या आत धगधगत आहे. विजेत्याचा वारसा सोडण्याची इच्छा मला अजूनही प्रेरणा देते. मी ड्रेसिंग रूमसाठी नाही तर यूपीच्या आत्म्यासाठी लढणार आहे.
Tweet
It’s a privilege to be in the contest again. Thanks Dr.Goenka for incl me in #LucknowIPLTeam as its mentor.The fire to win still burns bright inside me, the desire to leave a winner’s legacy still kicks me. I won’t be contesting for a dressing room but for the spirit & soul of UP
— Gautam Gambhir (@GautamGambhir) December 18, 2021
गंभीरच्या आधी लखनौ फ्रँचायझीने झिम्बाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवरला संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. याआधी तो पंजाब किंग्जचा सहाय्यक प्रशिक्षक होता. याशिवाय माजी यष्टिरक्षक विजय दहिया सहाय्यक प्रशिक्षक म्हणून संघात सामील होणार आहे. सध्या ते उत्तर प्रदेश क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. (हे ही वाचा IND vs SA 2021-22: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर 'केएल राहुल' कसोटी संघाचा उपकर्णधार, दुखापतीमुळे रोहित शर्माला विश्रांती.)
गौतम गंभीरने स्वतः आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्याने त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्ससाठी 2 वेळा 2012, 2014 आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. मात्र, कर्णधारपदावरून पायउतार झाल्यापासून केकेआरला कधीही विजेतेपद मिळवता आलेले नाही. यावेळी संघ निश्चितपणे अंतिम फेरीत पोहोचला होता. पण महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने केकेआरचे तिसरे विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही.
गंभीर हा दोन विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य आहे. 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने श्रीलंकेविरुद्ध 97 धावांची मॅच-विनिंग इनिंग खेळली होती. 2007 मध्ये T20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाचाही तो सदस्य होता. त्यानंतरही त्याने फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध 75 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली होती.